Nashik: कोकाटेंच्या मागणीनुसार राघोजी भांगरे स्मारक कामासंदर्भात गुरुवारी उपमुख्यमंत्री पवारांच्या दालनात बैठक

या बैठकीमुळे स्मारकाच्या कामास गती मिळेल,असा विश्वास आमदार माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला आहे.
Ajit Pawar, Manikrao Kokate
Ajit Pawar, Manikrao Kokateesakal

सिन्नर : आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या कामासंदर्भात उद्या २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ : ३० वाजता मुंबई येथील मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीची आमदार माणिकराव कोकाटे यांनी मागणी केली होती. (meeting held in Deputy CM ajit Pawar hall on Thursday regarding Raghoji Bhangre memorial work demand of Kokate Nashik)

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वासाळी येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून स्मारक मंजूर झाले आहे. यासंदर्भात यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३८८ कोटी ८४ लाख रुपयांचे स्मारक उभारणे व दुसऱ्या टप्प्यात उर्वरित काम करण्यासाठी ९६ कोटी रुपये इतक्या रकमेस मंजुरी देण्याचे निश्चित झाले होते.

त्याचबरोबर या स्मारकाच्या ठिकाणापासून जवळच असलेल्या कळसूबाई शिखरावर ये-जा करण्यासाठी रोप वे उभारण्याबाबत चर्चा झाली.

Ajit Pawar, Manikrao Kokate
Gas Cylinder Price: राजस्थानमध्ये 1 जानेवारीपासून गॅस सिलिंडर 450 रुपयांना, आधी मिळायचं 500 रुपयाला

त्यानुसार त्याचा २११ कोटी रकमेचा स्वतंत्र डीपीआर तयार करून केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेत मंजुरीसाठी पाठविण्यात यावा,असा निर्णय यापूर्वीच्या बैठकीत झाला होता.

स्मारकाच्या कामास गती मिळावी यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी वरील सर्व मुद्यांचा आपल्या पत्रात उल्लेख करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सर्व आदिवासी आमदारांसह बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती.

त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार यांनी आदिवासी आमदारांसह ग्रामविकासमंत्री, आदिवासी विकास मंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री त्याचप्रमाणे वरील सर्व विभागांचे अधिकारी यांच्यासमवेत उद्या मंत्रालयात सकाळी ११ : ३० वाजता बैठक बोलावली आहे.

या बैठकीमुळे स्मारकाच्या कामास गती मिळेल,असा विश्वास आमदार माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला आहे

Ajit Pawar, Manikrao Kokate
Pune : केंद्र व राज्य सरकारच्या कानठळ्या बसतील असे आंदोलन शेतकरी करतील; डॉ.अमोल कोल्हे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com