नाशिक : धनादेश न वटविल्याने दुधविक्रेत्याला दोन महिन्यांची कैद | nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prison

नाशिक : धनादेश न वटविल्याने दुधविक्रेत्याला दोन महिन्यांची कैद

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील धान्य व्यापारी रमेश लोहाडे यांच्याकडून दुध व्यवसायासाठी दुध विक्री व्यावसायिक प्रवीण देवरे (रा. संगमेश्वर) यांनी ८ लाख रुपये उसनवार घेतले होते. रक्कम परत फेडीसाठी श्री. देवरे यांनी स्टेट बँक मालेगाव शाखेचा ८ लाखाचा धनादेश दिला होता. बँकेत पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने धनादेश वटला नाही.

हेही वाचा: नाशिक : प्रेमसंबंधातून युवकावर शस्राने वार; भावासह तिघांवर गुन्हा

धनादेश न वटल्याने श्री. लोहाडे यांनी श्री. देवरे यांना चेक न वटल्याची नोटीस दिली. नोटीस मिळून देखील त्यांनी चेकची रक्कम न दिल्याने लोहाडे यांनी येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अर्चना तामणे यांच्या न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. या खटल्याचे कामकाज नुकतेच झाले. लोहाडे यांच्यातर्फे ॲडव्होकेट सुधिर अक्कर यांनी काम पाहिले. न्यायालयाने श्री. देवरे यांना दोषी ठरवित दोन महिने कैद, साडेआठ लाख रुपये नुकसान भरपाई व नुकसान भरपाईची रक्कम एक महिन्यात अदा न केल्यास पुन्हा एक महिन्याची कैद अशी शिक्षा सुनावली.

हेही वाचा: नाशिक : बिअरबार व देशी बार चालकांचा, अवैध मद्यविक्रीला विरोध

Web Title: Milk Seller Jail For Two Months Due To Not Clearing Check Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikAccused punishment
go to top