नाशिक : बाराव्या मजल्यावरील फ्लॅटला आग; लाखोंचे नुकसान

fire
fireesakal

जुने नाशिक : रविशंकर मार्ग येथील हरीमूर्ती इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागल्याची घटना गुरुवारी (ता. ३१) सायंकाळी घडली. आगीत फ्लॅटमधील संसारोपयोगी वस्तू जळून सुमारे दोन ते तीन लाखाचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक विभागाकडून देण्यात आली.

हरीमूर्ती इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील रवींद्र पाटील यांच्या १२०४ फ्लॅटमधून धूर येत असल्याचे शेजारच्यांच्या लक्षात आले. त्यांनी अग्निशामक विभागास माहिती दिली. अग्निशामक पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीत फ्रिज, वातानुकूलित यंत्र, पंखा बेड, पीओपीसह अन्य संसारोपयोगी साहित्य जळून राख झाले. आगीचे कारण समजू शकले नाही. पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तसेच आगीची ठिकाणांची उंची बघता अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य ब्रोनटो यंत्रणादेखील घटनास्थळी नेण्यात आली. इमारतीमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा असल्याने त्याच्या माध्यमातूनच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. फ्लॅट बंद असल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला. सुदैवाने फ्लॅटमध्ये कोणी नसल्याने जीवित हानी टळली. नुकसान मात्र मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांच्या मार्गदर्शनात कार्यालयीन प्रमुख राजेंद्र बैरागी, लीडिंग फायरमन इक्बाल शेख, इसाक शेख, हेमंत बेळगावकर, नाना गांगुर्डे, भीमाशंकर खोडे, शिवाजी फुगट, महेश कदम यांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले.

fire
गोदाप्रदूषण मुक्तीसाठी आयुक्तांचा ॲक्शन मोड
fire
अखेर ठरलं...! 2 मे पासून शाळांना सुट्टी; असा असेल सुट्यांचा कालावधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com