Nashik News : शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यातच ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अशातच शहरातील विविध भागात रस्त्यांची कामे सुरु आहेत.
या कामामुळे जलवाहिन्या फुटत असून जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाया जाते. (Millions of liters of water was wasted in Malegaon nashik news)
जलवाहिन्या फुटत असल्याने वाहणाऱ्या पाण्याला नाल्याचे स्वरुप प्राप्त होत आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहे. यामुळे अनेक भागामध्ये जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिनी फुटत असल्याने लाखो लिटर पाण्याची सर्वांच्या डोळ्यासमोर नासाडी होत आहे.
येथील दरेगाव नजीकच्या रिलायबल इस्टेटसमोर पाण्याचा एअर काढण्यासाठी व्हॉल्व बसविला आहे. गिरणा धरणातून येणारी ही प्रमुख जलवाहिनी आहे. या परिसरात यंत्रमाग कारखाने असून तो व्हॉल्व्ह एका वॉलकंपाउंड केलेल्या झाडीझुडपांमध्ये आहे. व्हॉल्व्हजवळ काही नागरिकांनी काळ्या रंगाची नळी टाकली आहे.
या व्हॉल्व्हमधून नळीद्वारे पाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात आहे. त्यामुळे येथील व्हॉल्व मधून पाण्याची गळती वाढली आहे. शहरातील काही व्हॉल्व जुने व जीर्ण झाले आहेत. या वॉल्व्हमधून रोज लाखो लिटर पाणी वाया जाते. येथील सोयगाव, डिके स्टॉप जवळही गेल्या काही दिवसांपूर्वी पाणी गळती होत होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
एकीकडे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असताना दुसरीकडे पाण्यासाठी माळमाथा परिसरात नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. शुक्रवारी माळमाथा भागातील नागरिकांना हक्काचे पाणी मिळावे म्हणून महिलांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालवर हंडा मोर्चा काढला होता.
येथील सैलानी चौकात कॉंक्रिटीकरण रस्त्याचे पंधरवाड्यापासून काम सुरु आहे. नळांना पाणी आले की या परिसरात लाखो लिटर पाणी वाया जाते.
त्यावेळी जणू या भागात वाहणारे पाण्याला नाल्याचे स्वरुप आले होते. महापालिकेने शहरातील जीर्ण झालेले व्हॉल्व्हची दुरुस्ती करावी जेणे करून पाण्याची गळती थांबवावी. जेणेकरुन पाण्याचा अपव्यय टाळता येईल अशी मागणी नागरिक करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.