Nashik News: अन्‌ रघुनाथ ‘रामा’च्या कुशीत शिरला..

गुरुवारी (ता. २१) सकाळी अकराच्या सुमारास बाजीराव फाउंडेशनचे संस्थापक साहेबराव आव्हाड वासननगर येथील महादेव पेट्रोलपंपावर कामा संबंधित माहिती घेत होते.
Little Raghunath with father Rama and mother Jyoti. Neighbors Sahebrao Awad, Ranganath Jaibhave, Rajesh Dongre etc
Little Raghunath with father Rama and mother Jyoti. Neighbors Sahebrao Awad, Ranganath Jaibhave, Rajesh Dongre etc esakal

Nashik News : गुरुवारी (ता. २१) सकाळी अकराच्या सुमारास बाजीराव फाउंडेशनचे संस्थापक साहेबराव आव्हाड वासननगर येथील महादेव पेट्रोलपंपावर कामा संबंधित माहिती घेत होते. तितक्यात त्यांच्या नजरेस तीन वर्षाचा बालक रडत येताना दिसला.

त्यांनी नाव वगैरे विचारण्याचा प्रयत्न केला मात्र तो काहीही सांगत नव्हता आणि रडत होता. अंगात फक्त शर्ट होता. (missing child found by person nashik news)

श्री. आव्हाड यांनी जवळच्या एका दुकानातून नवी पॅन्ट आणून त्याला घातली, खाऊ दिला मात्र त्याचे रडणे थांबेना. आव्हाड यांनी पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. शिवाय ते सक्रिय असलेल्या सुमारे ७२ व्हॉट्सअप ग्रुपवर या मुलाचे छायाचित्र टाकले आणि हा सापडला आहे अशी पोस्ट केली.

त्यांच्यासोबत असलेल्या रंगनाथ जायभावे, राजेश डोंगरे, अशोक फड, संदीप शिंदे आदींना सोबत घेऊन आसपास चौकशी सुरू केली. राधेगणेश सोसायटीमध्ये राहणारे आणि मूळचे इसार (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील रहिवासी राम भोसले यांचा मुलगा रघुनाथ हरविल्याने सर्व रहिवासी त्याचा शोध घेत होते.

Little Raghunath with father Rama and mother Jyoti. Neighbors Sahebrao Awad, Ranganath Jaibhave, Rajesh Dongre etc
Gajanan Maharaj Paduka: श्री गजानन महाराजांच्‍या चैतन्‍य पादुका नाशिकमध्ये; भाविकांना संपर्काचे आवाहन

रघुनाथची आई ज्योती यांची रडून वाईट स्थिती झाली होती. इतक्यात आढाव यांनी टाकलेली पोस्ट त्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या एकाने बघितली आणि त्याने त्यांना तो फोटो दाखवत हाच मुलगा आहे का, असे विचारले. त्यांनी हो सांगितले आणि ते धावतच पंपाकडे निघाले. रडत असलेल्या त्या चिमुरड्याने धावत येणारे वडील बघितले आणि त्यानेदेखील त्यांच्याकडे धाव घेतली आणि ‘रामा’ च्या कुशीत रघुनाथ शिरला.

उपस्थित सगळ्यांनाच आनंद झाला. तितक्यात आई ज्योती देखील तेथे पोचल्या आणि काळजाचा तुकडा सुखरूप बघून त्यांनी देखील आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. भोसले परिवाराने आव्हाड आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.

Little Raghunath with father Rama and mother Jyoti. Neighbors Sahebrao Awad, Ranganath Jaibhave, Rajesh Dongre etc
Nashik News: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांकडून आरोग्यवर्धिनी केंद्राबाबत महापालिकेस अल्टिमेटम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com