Nashik News : पाच दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhushan Bhagde

Nashik News : पाच दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत

इगतपुरी शहर : नांदगाव सदो येथील पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भूषण गणेश भागडे (वय २३) याचा मृतदेह शुक्रवारी (ता. २०) नांदगाव सदो येथील समृद्धी महामार्गालगत एका विहिरीत आढळला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून, घातपात झाल्याची कुजबूज सुरू आहे.

पोलिसांना मृतदेहाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेत विहिरीतून मृतदेह क्रेनच्या सहाय्याने काढला. त्यानुसार पोलिसांची पुढील कार्यवाही सुरू आहे. आत्महत्या की घातपात, याबाबत चर्चा सुरू झाल्याने पोलिसांनी बारकाईने तपासाला सुरवात केली आहे. (Missing for five days Young man body in well Suicide or accident Police investigate nashik news)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Jalgaon News : गोद्रीची पाणी, रस्ते, आरोग्याची समस्या सुटली

समृद्धी महामार्गावरील मजुरी कामाला जातो, असे सांगून गेलेला भूषण घरी परतला नाही म्हणून वडील गणेश पांडुरंग भागडे यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे. काही दिवसांपूर्वीच भूषणचे लग्न जमले होते.

मनमिळाऊ असणाऱ्या भूषणच्या बेपत्ता होण्यामुळे या भागातील ग्रामस्थ चिंतेत होते. भूषणचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. पोलिस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करीत आहे.

हेही वाचा: Nashik News : चोंढीला बिबट्या जाळ्यात; मात्र सुटकेच्या प्रयत्नात जखमी