Nashik Mistura Art Fest 2024 : शौर्य NGOतर्फे 27 व 28 जानेवारीला 'मिस्तुरा कला महोत्सव'

"मिस्तुरा कला महोत्सव- २०२४ हा २७ व २८ जानेवारी रोजी सुयोजित क्रिकेट प्राऊंड, बापू पूल, नाशिक येथे होणार आहे.
Nashik Mistura Art Fest 2024
Nashik Mistura Art Fest 2024esakal

नाशिक : येथील शौर्य एनजीओतर्फे आयोजित करण्यात आलेला "मिस्तुरा कला महोत्सव- २०२४ हा २७ व २८ जानेवारी रोजी सुयोजित क्रिकेट प्राऊंड, बापू पूल, नाशिक येथे होणार आहे.

हा कला महोत्सव सशुल्क असून तिकीट विक्री मधून जे काही पैसे येणार आहेत त्यातून सिन्नर तसेच नाशिकमध्ये ६० पेक्षा अधिक अशिक्षित बालकांसाठी क्लासरूम निर्माण करण्यासाठी या निधीचा वापर करणार आहेत. (Mistura art festival 2024 on 27 and 28 January by Shaurya NGO nashik news)

ह्या वर्षाच्या कार्यक्रमात मुख्यतः भगवान रामाचं एक अत्यंत सुंदर प्रकटोत्सव पाहणार आहोत. मिस्तुरा कला महोत्सव" हा शौर्य एनजीओ आयोजित करते, हा महोत्सव चित्रकलेच्या आणि सामाजिक समृद्धीसाठी महत्वाचा आहे. या महोत्सवात सकारात्मक परिवर्तन करण्याची शक्ती आहे. ही सामाजिक संस्था सृजनात्मकता, सांस्कृतिक समज, आणि समुदाय विकास क्षेत्रात काम करते.

शौर्य ही एक गैर-सरकारी संस्था असून ही संस्था वंचितांच्या सुधारणेसाठी काम करत असून बंचितांसाठी शिक्षण शिक्षणाचा प्लॅटफॉर्म प्रदान करीत आहे. त्यांच्यासाठी विविध उपक्रमांसाठी निधी उभारणे, येणाऱ्या पिढीसाठी एक उत्तम समाज निर्माण करण्याचा प्रयत्न या स्वयंसेवी संस्थेमार्फत होत आहे. शौर्य कलाकारांसाठी एक सोशल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे.

प्रतिवर्षी हा कला महोत्सव सकारात्मक कलेच्या विभागांचं संगम करतं, जसे की दृष्टिकोन कला, परिचित आणि नविन कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याचं एक स्थान प्रदान करत. कलेची विविधता, सकारात्मक चरित्रे, समुदाय सहभागिता आणि सृष्टिकला यांच्या माध्यमातून सामाजिक विषयांच्या अन्वेषणाचे हा महोत्सव प्रतिनिधित्व करतो, मिस्त्रा कला महोत्सव हा नाशिकमधील कलाकारांचा कला कार्यक्रम आहे.

Nashik Mistura Art Fest 2024
Devgiri short film fest : जळगावला 27 पासून देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल

ज्यामध्ये कला प्रकारांची विस्तृत श्रेणी संगीत, नृत्य, चित्रपट, ललित कला, साहित्य, कविता इ. समाविष्ट आहे. गेल्या सहा वर्षापासून याचे वशस्वी आयोजन होत असून यात अनेक कलाकार सहभागी होत आहेत. या महोत्सवात कलाकारांना त्यांची कला आणि प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. याचा हजारो श्रोते आणि कलाकारांनी आनंदही पेतला आहे.

शौर्य संस्थेतर्फे समाजातील वंचित क्षेत्राला सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात, त्यांचे शिक्षण, आरोग्य आणि शाश्वत उपजीविका यांद्वारे त्यांचे जीवन समृद्ध करणे, शिक्षणाद्वारे अनाथ मुलांचे जीवनमान सुधारते. या वर्षी मिस्तुरा कला महोत्सवामध्ये एक छोटासा खेळ करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या कला महोत्सवाचे प्रवेश तिकीट ५०/- रू. असून या तिकिटाद्वारे गोळा केलेली सर्व रक्कम क्लासरूम निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या उपक्रमाला अधिकाधिक प्रतिसाद देण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.

Nashik Mistura Art Fest 2024
Mistura Art Fest 2022 : यंदा रंगणार मिस्‍तुरा आर्ट फेस्‍ट!; 24, 25 डिसेंबरला आयोजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com