esakal | आमदार ढिकले यांची खासगी रुग्णालयात झाडाझडती
sakal

बोलून बातमी शोधा

mla from nashik adv. rahul dhikale

राज्य शासनाकडून ऑक्सिजन पुरवठ्यात हलगर्जी होत असल्याने जाब विचारण्याचे आश्‍वासन आमदार ढिकले यांनी या वेळी दिले.

आमदार ढिकले यांची खासगी रुग्णालयात झाडाझडती

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नाशिक : बेड मिळण्यापासून ते ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी पूर्व विभागातील चार खासगी हॉस्पिटलला भेट देत झाडाझडती घेतली. रुग्णांच्या नातेवाइकांनी ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात तक्रार केल्यानंतर ऑक्सिजन उपलब्धतेची पाहणी केली. राज्य शासनाकडून ऑक्सिजन पुरवठ्यात हलगर्जी होत असल्याने जाब विचारण्याचे आश्‍वासन आमदार ढिकले यांनी या वेळी दिले.

हेही वाचा: मुख्यमंत्री ठाकरेंनी वाढविले झाकिर हुसेन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य

राज्य शासनाने कोविड सेंटर म्हणून जाहीर केलेल्या रुग्णालयांमध्ये ८० टक्के बेड राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु अनेक रुग्णालयांत बेड मिळत नाही. राज्य शासनाच्या सूचनेनुसार बिलांची आकारणी होत नाही. महापालिकेच्या लेखापरीक्षकांकडून बिले तपासली जात नाहीत आदी तक्रारी आमदार ढिकले यांना प्राप्त झाल्यानंतर शनिवारी (ता.२४) त्यांनी खासगी रुग्णालयांची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला. नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटल, सुजाता बिर्ला हॉस्पिटल, सिद्धिविनायक, पंचवटीतील अपोलो हॉस्पिटलला भेटी देऊन पाहणी केली. रुग्णालयांच्या झाडाझडतीत ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याचे कारण समोर आले. रुग्णालयांमध्ये वाढीव बेडची क्षमता असली तरी ऑक्सिजन साठा कमी असल्याने क्षमतेइतके बेड चालवू शकत नसल्याची अडचण रुग्णालय व्यवस्थापनाकडून मांडण्यात आली.

हेही वाचा: डॉक्‍टरांना अपेक्षा मुबलक ऑक्सिजन, रेमडेसिव्‍हिरची

दाखल रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा संपुष्टात आल्यास स्वतःच्या जबाबदारीवर न्यावे लागेल, असे हमीपत्र लिहून घेतल्याची बाब समोर आली. महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागाकडून बिल तपासणी नियमित होत नाही. नियमानुसार ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा नियम पाळला जात नसल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाइकांनी मांडल्या. ऑक्सिजनच्या समस्येवर आमदार ढिकले यांनी तत्काळ जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी संपर्क साधला. काही रुग्णालयांमध्ये दोन ते तीन तासांत ऑक्सिजन पुरवठा संपुष्टात येणार असल्याची बाब लक्षात आणल्यावर ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्याचे आश्‍वासन देण्यात आले. अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नाडे यांनी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर कोणत्या रुग्णाला कधी ऑक्सिजन फिलिंग करणार यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर करण्याचे आदेश काढले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. नगरसेवक अंबादास पगारे, संतोष क्षीरसागर आदी उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे ४६ बळी; पाच हजार ३४ रुग्ण बरे

कोरोनाशी लढा देताना सर्वसामान्यांना कोणतेही चटका बसणार नाही याची काळजी राज्य शासनाने घेतली पाहिजे. जे खासगी रुग्णालय अकारण कोंडी करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

- ॲड. राहुल ढिकले, आमदार

loading image
go to top