esakal | ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर पुरवठ्यात नाशिकवर अन्याय; आमदार हिरेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

Seema Hire

ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर पुरवठ्यात नाशिकवर अन्याय; आमदार हिरेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. मात्र, शासनाकडून रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात नाशिकवर अन्याय होत असल्याची भावना आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यासाठी मुबलक ऑक्सिजन व रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात बेड व ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. जिल्ह्यात रोज चार ते पाच हजार कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात ४८ हजार ५७८ कोरोनाबाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. काही दिवसांत अडीच ते तीन हजार नागरिक कोरोनामुळे दगावले आहेत. नवीन बाधित रुग्ण उपचारासाठी लागणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शन जिल्ह्यासाठी रोज दहा हजारांची मागणी असताना, रविवारी (ता. २५) नाशिकला फक्त ४४५ इंजेक्शन मिळाले. लोकसंख्येच्या तुलनेत बाधितांची संख्या नाशिक जिल्ह्यात अधिक असताना नाशिकवर अन्याय होत आहे. शनिवारी (ता. २४) जिल्ह्याच्या वाटेला एकही इंजेक्शन आले नाही. पुणे व ठाण्यात रुग्ण कमी असूनही सर्वाधिक कोटा मिळत असल्याने नाशिकवर अन्याय होत असल्याची भावना आमदार हिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.

हेही वाचा: मरायचे असेल तर अकराच्या आत! शहरात मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिकमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत असताना, ऑक्सिजन व रेमडेसिव्हिर इंजेक्शन वाटपात नाशिकवर अन्याय केला जात आहे.

-सीमा हिरे, आमदार

हेही वाचा: होम क्वारंटाईन कोरोनाबाधितांसाठी ‘आयएमए’तर्फे ‘नाशिक कोविड हेल्पलाइन’

loading image