Nashik News: सिन्नरमधील खरेदीप्रकरणी शासनाची केली फसवणूक : आमदार कांदे

suhas kande and vikhe patil
suhas kande and vikhe patil

Nashik News: शेतकरी असल्याचे बनावट पुरावे देऊन येथील प्रसिद्ध उद्योजक अशोक कटारिया यांनी सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती जमिन घेतल्याचा आरोपासंदर्भात आज विधानसभेत नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी मुद्दा उपस्थित करत संबंधितांनी शासनाची फसवणूक केल्याने कारवाईची मागणी केली.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यासंदर्भात गरज भासल्यास एसआयटीमार्फत चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती सभागृहात दिली. ( MLA Kande statement government was cheated in purchase case in Sinnar nashik news)

सामाजिक कार्यकर्ते नितीन सुगंधी यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन कटारीया यांच्यावर शेतकरी असल्याचे चुकीचे पुरावे दिल्याचा आरोप केला होता. श्री. कटारिया यांनी १९८० मध्ये जमिन घेतानाच बनवाट पुरावे दिल्याचा आरोप आमदार कांदे यांनी केला आहे.

त्यावेळी त्यांच्याकडे कोणताही शेतकरी पुरावा नसताना त्यांनी जमिन खरेदी केली. त्यावेळी तयार करण्यात आलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताराच्या आधारे नंतर त्यांनी हजारो एकर शेतजमीन खरेदी केली. यासंदर्भात सिन्नर तहसील कार्यालयात दावा दाखल आहे. तहसीलदारांनी कटारिया यांना म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर त्यांचा युक्तिवाद अमान्य करण्यात आला.

suhas kande and vikhe patil
Salim Kutta Dance Case: आयुक्तांच्या चौकशीला बडगुजरांची ‘त-त-फ-फ’! प्रश्नांच्या भडिमाराने बडगुजर तणावात

कटारिया यांच्या नावावर असलेली शेतजमीन शासन जमा करण्याचे आदेश देताना निफाड उपविभागिय कार्यालयाकडे दाद मागण्यासाठी मुदत दिली. निफाड प्रांताकडे दाद न मागता वेळकाढूपणा केल्याचा आरोप श्री. सुगंधी यांनी केला होता.

त्यानंतर आज आमदार कांदे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, कटारिया यांच्या वडिलांकडे सिन्नर तालुक्यातील कराड नामक शेतकऱ्याने शेती नजरगहाण ठेवली होती.

मात्र कटारिया यांनी नजरगहाण खताच्या आधारे सातबारा उताऱ्यावर नाव लावले व सिन्नर तालुक्यात दोन हजार एकर जमीन खरेदी केली. यातून शासनाची फसवणुक झाल्याचा दावा कांदे यांनी केला. दरम्यान विखे-पाटील यांनी सिन्नर, निफाड, इगतपुरी तालुक्यात जमिनी घेतल्याचे आढळून आल्याचे सांगत कारवाईचे आश्‍वासन दिले.

suhas kande and vikhe patil
Viksit Bharat Sankalp Yatra: विकसित भारत संकल्प यात्रा रोखल्यास गुन्हे दाखल करा : जलज शर्मा यांचे निर्देश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com