Nashik Narendra Modi : मोदींनी व्हावे नाशिकचे खासदार! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोअर टीममध्ये चर्चा

जगविख्यात नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन टर्मपासून वाराणसीतून खासदार म्हणून निवडून येत आहेत.
Narendra Modi, Yashwantrao Chavan
Narendra Modi, Yashwantrao Chavanesakal

Nashik Narendra Modi : जगविख्यात नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन टर्मपासून वाराणसीतून खासदार म्हणून निवडून येत आहेत. दहा वर्षांत वाराणसी अर्थात, काशीचे चित्र जागतिक पातळीवर आमूलाग्र पद्धतीने बदलले आहे. आता पुढच्या काळात मोदींनी नाशिकमधून खासदारकी करावी, अशी लोकभावना जोर धरत आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत मोजक्या मंडळींच्या कोअर टीममध्ये या संदर्भातील चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. (Modi should become MP from Nashik discussed in Rashtriya Swayamsevak Sangh core team nashik news)

काशीनंतर पंतप्रधानांनी ‘दक्षिण काशी’ अर्थात, नाशिकला कर्मभूमी केल्यास नाशिकचे चित्र अत्यंत वेगाने पालटू शकते, ही बाब प्रत्यक्षात उतरावी, यासाठी काही संत-महंतांनीही प्रयत्न सुरू केल्याची माहिती ‘सकाळ’ला सूत्रांनी दिली.

नाशिक ही धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिकनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. कुंभनगरीमुळे नाशिकचा लौकिक जागतिक पातळीवर आहे. त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगमातेमुळे देशभरातील भाविकांचा राबता नाशिकमध्ये सतत असतो. रामतीर्थाच्या परमपवित्र स्थळामुळे नाशिक शहर सतत गजबजलेले असते.

या नगरीला आता खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी यांच्यासारख्या ‘भगीरथा’ची नितांत आवश्यकता आहे. मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे या धार्मिक नगरीत विकासाची गंगा अवतरू शकते. या गोष्टींचा विचार करून पंतप्रधान नरेंद मोदी यांना नाशिकमधून लोकसभेत जाण्याचे निमंत्रण देण्यासाठी समाजातील सर्व घटकांकडून आग्रह व्हावा, असा एक मतप्रवाह सध्या जोर धरत आहे.

Narendra Modi, Yashwantrao Chavan
Nashik Narendra Modi : पंतप्रधानांची सभा ‘साधुग्राम’वरच होण्याची शक्यता

छत्रपती शिवरायांच्या मराठी मातीतून मोदींनी खासदार व्हावे, यासाठी समाजातील काही मान्यवर प्रयत्नशील असल्याची खात्रीलायक माहिती ‘सकाळ’ला प्राप्त झाली आहे. नाशिकला कित्येक वर्षांपासून विकासाची आस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकची निवड केल्यास नाशिकची उंची देश-परदेशात अत्यंत कमी कालावधीत कित्येक पटींनी वाढेल, हीच यामागची भूमिका असल्याचे या दिग्गज मंडळींचे म्हणणे आहे.

एकमताने केले होते यशवंतरावांना खासदार

नाशिकचा पूर्वइतिहास या संभाव्य घडामोडींसाठी पूरक आहे. महाराष्ट्राचे बुलंद नेतृत्त्व यशवंतराव चव्हाण यांचा ऋणानुबंध नाशिकशी १९६२ मध्ये जुळला. चीनने भारताचा पराभव केल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती सावरण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी ‘यशवंतराव बळवंतराव चव्हाण’ यांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत बोलविले.

मुख्यमंत्री असलेल्या यशवंतरावांना दिल्लीच्या तख्तावर बसविण्यासाठी खासदार होणे आवश्यक होते. तेव्हा त्यांची बिनविरोध निवड करण्यासाठी नाशिकनेच पुढाकार घेतला होता. लोकसभा निवडणुकीत यशवंतरावांची बिनविरोध निवड झाल्यानंतर नाशिक येथील एका सभेत कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी यशवंतरावांविषयी ‘भूगोलात कृष्णा गोदावरीचा संगम नाही, पण या निवडणुकीने हा संगम घडवून आणला,’ असे भावनिक मनोगत व्यक्त केले होते.

नाशिकमधील याच सभेत यशवंतरावांनी ‘नाशिकचे ऋण फेडल्याशिवाय राहणार नाही,’ असे आश्वासन दिले होते. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाशी संबंधित मिग विमान कारखाना अर्थात, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ओझर येथे सुरू करून त्यांनी आपले आश्वासन पूर्णदेखील केले होते.

Narendra Modi, Yashwantrao Chavan
Nashik Narendra Modi : साधुग्रामच्या जागेवरच युवा महोत्सव; गिरीश महाजन यांच्याकडून जागेची पाहणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com