Phule Jan Arogya Yojana : महात्मा फुले जनआरोग्याचे पैसे मिळेना! राज्यातील 1 हजार 350 रुग्णालये आर्थिक अडचणीत

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojanaesakal

किरण कवडे ः सकाळ वृत्तसेवा

Phule Jan Arogya Yojana : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना दर्जेदार वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे पैसे दोन महिन्यांपासून थकीत असल्याने रुग्णालयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. रुग्णांच्या उपचारांचे पैसे वेळेत मिळत नसल्याने उपचारांवरही परिणाम होत असल्याने या योजनेच्या मुख्य उद्देशालाच बाधा पोहोचत आहे.

महागडे वैद्यकीय उपचार सर्वसामान्य व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. (money for treatment of patients is not received in time of mahatma phule jan arogya yojana nashik news)

गरिबांनाही वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारने २१ नोव्हेंबर २०१३ पासून महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. राज्यातील २८ जिल्ह्यांमधील जवळपास महत्त्वाच्या सर्व रुग्णालयांमार्फत ही योजना राबवली जाते.

विशेष म्हणजे जुलै २०२३ मध्ये या योजनेची व्याप्ती वाढवत सरकारने एक हजार ३५६ उपचार व एक हजार ३५० रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे तालुका पातळीवरील रुग्णालयापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचण्यास मदत झाली. यापूर्वी कुटुंबासाठी खर्चाची मर्यादा ही दीड लाख रुपये होती. त्याचीही मर्यादा वाढवून पाच लाख रुपये केली.

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडीच लाखांपर्यंत मर्यादा निश्चित करून दिली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमुळे सर्वसामान्य व्यक्तींवर उपचार होऊ लागले. पण, या सर्व रुग्णांचा खर्च भागविण्यासाठी सरकारने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीबरोबर करार केला आहे. या कंपनीला दोन महिन्यांपासून शासनाकडून पैसेच मिळालेले नाहीत. त्यामुळे इन्शुरन्स कंपनी रुग्णालयांना उपचारार्थ देय रक्कम देत नसल्याने रुग्णालये आर्थिक अडचणीत सापडली आहेत.

रुग्णालयांची अदृश्य व्यूहरचना

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
Nashik Sugar Factory: दसऱ्याला ‘नासाका’चा बॉयलर पेटणार : खासदार गोडसे

जनआरोग्य योजनेचे पैसे मिळत नसल्याने रुग्णांनी या योजनेतून उपचार घेऊच नये, यासाठी काही रुग्णालये प्रयत्नशील असल्याचे दिसते. रुग्णांना या योजनेची माहिती मिळणार नाही किंवा दिलेली माहिती त्रोटक स्वरूपात देण्याकडे कल असून, रुग्णांच्या नातेवाइकांच्या मानसिकतेशी खेळण्याचा प्रकार वाढल्याने या योजनेपासून लोक दुरावण्याची अदृश्य व्यूहरचनाच जणू आखली गेली आहे.

जिल्हानिहाय रुग्णालये

नाशिक- ७३, अहमदनगर- ४३, धुळे- २४, अमरावती- २२, छत्रपती संभाजीनगर- ३८, भंडारा- १३, बुलढाणा- २५, चंद्रपूर- १०, गडचिरोली- १०, गोंदिया- ११, जळगाव- ३९, कोल्हापूर- ६५, मुंबई- ५७, नांदेड- ४०, पालघर- १५, परभणी- १३, पुणे- ६९, रत्नागिरी- १२, सांगली- ३८, सातारा- २७, सिंधुदुर्ग- ११, सोलापूर- ५१, ठाणे- ६३, वर्धा- ९, वाशीम- १३, यवतमाळ- २१, अकोला- २१.

"इन्शुरन्स कंपनीला टप्प्याटप्प्याने निधी देण्यास सुरवात झाली आहे. २२ कोटी रुपये आम्ही दिले असून, पुढील काही दिवसांत कंपनीचे सर्व पैसे देण्याचे नियोजन झाले. त्यामुळे वैद्यकीय सुविधा मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही." - मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जनआरोग्य योजना

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
Onion Subsidy News : कांदा अनुदानापासून 619 शेतकरी वंचित; पडताळणीअंती ठरविले अपात्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com