Monsoon Update : संततधार पावसाचा ऑगस्‍टमध्येही विक्रम

Monsoon Update News
Monsoon Update Newsesakal

नाशिक : शहर जिल्ह्यात संततधार पावसाची रिपरिप सुरुच आहे. जुलै महिन्यात ८१ वर्षाचा उच्चांकी पावसाच्या विक्रमानंतर आता ऑगस्ट महिन्यातही पावसाने महिन्याच्या सरासरीचा विक्रम ओलांडला आहे. परिणामी, जिल्ह्यातून जायकवाडी धरणाला कोट्याहून अधिक पाणी सोडूनही ९० टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे. (Monsoon Update Record of heavy rains in August too latest Nashik marathi news)

जुलै महिन्यात यंदा विक्रमी पाऊस झाला. साधारण सरासरीच्या दोनशे टक्के अधिक पाऊस झाल्याने जुलै महिन्यातच जायकवाडी धरणासाठी साडेचार टीएमसीहून अधिक पाणी सोडले गेले. त्यानंतर जुलै प्रमाणेच ऑगस्ट महिन्यातही पावसाची संततधार सुरुच आहे.

ऑगस्टमहिन्याच्या पंधरवाड्यातच जायकवाडी धरण भरून वाहत असून नाशिकच्या धरणात ९० टक्केहून अधिक पाणीसाठा झाल्याने आठवड्यापासून पुन्हा सातत्याने गोदावरीतील विसर्ग वाढविण्याची वेळ आली आहे.

Monsoon Update News
11th Admission : दुसऱ्या फेरीअखेर 11 हजार 799 प्रवेश निश्‍चित

२८ टक्के अधिक

ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात मासिक सरासरीच्या २८ टक्केहून अधिक पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात साधारण १४६ मि.मी पावसाची सरासरी आहे. मात्र यंदा पंधरा दिवसातच १८७. ६ मि.मी पाऊस झाला आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पावसाच्या सरासरीच्या तुलनेत १२८ टक्के इतका पाऊस झाला आहे. जुलैत २०० टक्के पावसानंतर आता ऑगस्ट महिन्यात १२८ टक्के पाऊस झाल्याने दोन्ही महिन्यातील सरासरी ओलांडून धो- धो बरसणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठा ९० टक्केहून अधिक झाला आहे. तसेच विर्सगात सातत्याने वाढ करावी लागत आहे.

Monsoon Update News
NMC सांस्कृतिक महोत्सव : कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मिळविली दाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com