esakal | जायकवाडीसाठी पाच वेळा 'इतके' टीएमसीहून अधिक पाणी रवाना...!
sakal

बोलून बातमी शोधा

jaykwadi.jpg

बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंत जिल्ह्यातून ११.३ टीएमसी पाणी जायकवाडीकडे रवाना झाले. जलसंपदा विभागाकडे १९७१ पासून उपलब्ध असलेल्या नांदूरमध्यमेश्‍वरमधील ‘डिस्चार्ज’च्या माहितीच्या आधारे गेल्या वर्षीपर्यंत पाच वेळा १०० टीएमसीहून अधिक पाणी जायकवाडीसाठी एका वर्षात रवाना झाले. 

जायकवाडीसाठी पाच वेळा 'इतके' टीएमसीहून अधिक पाणी रवाना...!

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्याने स्वातंत्र्य दिनापूर्वीच नाशिक आणि नगरच्या धरण समूहातून पाणी सोडण्याची आवश्‍यकता राहिली नसल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंत जिल्ह्यातून ११.३ टीएमसी पाणी जायकवाडीकडे रवाना झाले. जलसंपदा विभागाकडे १९७१ पासून उपलब्ध असलेल्या नांदूरमध्यमेश्‍वरमधील ‘डिस्चार्ज’च्या माहितीच्या आधारे गेल्या वर्षीपर्यंत पाच वेळा १०० टीएमसीहून अधिक पाणी जायकवाडीसाठी एका वर्षात रवाना झाले. 

‘सिंगल डिजिट’ टीएमसीमध्ये पाणी रवाना होणारी वर्षेसुद्धा पाचच 

जिल्ह्यातून जायकवाडीकडे 'सिंगल डिजिट' टीएमसी पाणी रवाना झाल्याची पाच वर्षे आहेत. त्यात १९८५ मधील ४.४८, १९८७ मधील ७.०६, १९९५ मधील ५.३२, २००९ मधील ५.१९, २०१२ मधील ८.८१ टीएमसी पाण्याचा समावेश होता. दरम्यान, एक तपानंतर गेल्या वर्षी सर्वाधिक ११५ टीएमसी पाणी जायकवाडीला गेले होते. त्याअगोदर २००६ मध्ये १६२.३० आणि २००५ मध्ये १७०.३९ टीएमसी पाणी नांदूरमध्यमेश्‍वरमधून गेले होते. गेल्या ५० वर्षांमध्ये जायकवाडीसाठी सर्वाधिक पाणी २००५ मध्ये गेले आहे. याखेरीज १९९४ मध्ये ११६.९९ आणि १९८१ मध्ये १३०.३१ टीएमसी पाणी जायकवाडीला गेले होते. दारणा, गंगापूर आणि पालखेड धरण समूहातून सोडण्यात येणारे पाणी नांदूरमध्यमेश्‍वर बंधाऱ्यातून गोदावरीमध्ये सोडले जाते. हे पाणी मजल-दरमजल करत जायकवाडीमध्ये पोचते. १९७१ मध्ये ६६, १९७२ मध्ये २२.६९, १९७३ मध्ये ८७.३०, १९७४ मध्ये १६.६१, १९७५ मध्ये ५५.५१ टीएमसी पाणी नांदूरमध्यमेश्‍वरमधून गोदावरीतून जायकवाडीकडे रवाना झाले होते. २०१८ मध्ये २४.९०९ टीसीएम पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले होते. 

पावसाने दिली उघडीप 

पश्‍चिम पट्ट्यासह पूर्व भागात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाने उघडीप घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७३.७८ टक्के पाऊस झाला आहे. तालुकानिहाय झालेल्या पावसाची टक्केवारी अशी (कंसात बुधवारी सकाळी आठला संपलेल्या २४ तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये) ः नाशिक- ७४.२२ (१.२), इगतपुरी- ८७.५१ (४४), दिंडोरी- ६०.२२ (१), पेठ- ५०.३४ (१७), त्र्यंबकेश्‍वर- ४८.८० (१३), मालेगाव- १३७.०२ (०), नांदगाव- १०८.२८ (०), चांदवड- ७३.६७ (४), कळवण- ६८.३२ (१), बागलाण- १३३.१४ (०), सुरगाणा- ४८.४६ (५.२), देवळा- ९८.५८ (०), निफाड- ८०.६३ (४.२), सिन्नर- ११६.३९ (२), येवला- ९५.०१ (०). 

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

धरणात साठा ६६ टक्के 

जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये साठा ६६ टक्के झाला आहे. भावली, वालदेवी, कडवा, भोजापूर, हरणबारी, माणिकपुंज ही धरणे तुडुंब झाली आहेत. दारणामधून चार हजार १६४, भावलीतून १३५, वालदेवीमधून २४१, नांदूरमध्यमेश्‍वर मधून चार हजार ८४२, भोजापूरमधून ११४, हरणबारीमधून एक हजार २२२, पुनंदमधून ६२० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिककरांची तहान अवलंबून असलेल्या गंगापूरमध्ये ८५, दारणामध्ये ९० टक्के साठा झाला आहे. गिरणा धरण ५९ टक्के भरले आहे.  

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

संपादन - किशोरी वाघ

loading image
go to top