नाशिक : पांढुर्लीला मुलाला जिवंत जाळल्याचा मातेचा आरोप

death by burning
death by burningsakal

नाशिक : पांढुर्ली (ता. सिन्नर) येथील शैलेश ऊर्फ आवड्या विजय मोरे याच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करावी तसेच पुरलेला त्याचा मृतदेह उकरून काढून त्याचे शवविच्छेदन करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

पांढुर्ली (ता. सिन्नर) येथील शैलेश ऊर्फ आवड्या विजय मोरे याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्यात आल्याचा गंभीर आरोप त्याची आई अलका विजय मोरे हिने केला आहे. हा प्रकार अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळिमा फासणारा आहे. सदर महिला, त्यांचे पती विजय राणू मोरे यांच्यासह पांढुर्ली येथे वास्तव्यास आहे. मोलमजुरी करून हे कुटुंब आपले पोट भरतात. या कुटुंबाची व्यथा ऐकून घेऊन न्याय द्यावा, असे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

death by burning
काश्मीर फाईल्स : भगवी शाल घातल्याने महिलेला थिएटरमध्ये नाकारला प्रवेश
death by burning
एसटी संप जीवावर बेतला! आणखी एका कर्मचाऱ्याची आत्महत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com