काश्मीर फाईल्स : भगवी शाल घातल्याने महिलेला थिएटरमध्ये नाकारला प्रवेश

The Kashmir Files
The Kashmir Filesesakal

नाशिक : भगवी शाल घातल्याने द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपटाला प्रवेश नाकारल्याची तक्रार करीत, आज द काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या शो दरम्यान पीव्हीआर (PVR) सिनेमामध्ये गोंधळ होऊन काही काळ परिसरात तणावाचे वातावणरण होते.

...आणि शो खास महिलांसाठी होता

महिला प्रेक्षकाला भगवी शाल घालून चित्रपटगृहात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर काही महिला आक्रमक झाल्या. त्यांनी सुरक्षारक्षकांना जाब विचारला. इतर महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, पोलिस आल्यावर काही वेळात हे प्रकरण परस्पर सामंजस्याने मिटवण्यात आले. कॉलेजरोडवरील पीव्हीआर सिनेमा चित्रपटगृहात बुधवारी द काश्मीर फाईल्स चित्रपटाचा शो खास महिलांसाठी आयोजित केला होता. यावेळी एक महिला भगवी शाल परिधान करून आली. सुरक्षारक्षकांनी प्रवेशाला विरोध केल्याने महिला आणि सुरक्षारक्षकांत बाचाबाची झाली. त्यामुळे गोंधळ वाढला. महिलांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

The Kashmir Files
राज्याची विजेची उच्चांकी मागणी पुरवण्यासाठी महानिर्मिती सज्ज
The Kashmir Files
नाशिक : रंगपंचमीला पोलिसांच्या अटीं- शर्थींचा भंग; 5 मंडळांवर गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com