काळापुढे आईचे प्रयत्नही हरले!...ह्रदयद्रावक घटना

MOTHER AND SON DEATH.jpg
MOTHER AND SON DEATH.jpg

नाशिक : मिठसागरे (वावी, ता. सिन्नर) येथे मेढरे चारण्यासाठी गेलेल्या माय-लेकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा घटना समोर आली आहे. लेकराला वाचवायला माय गेली पण, प्रयत्न अपयशी झाला. दोघांवरही काळ ओढावल्याने त्यांना जीव गमवावा लाग ला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अशी आहे घटना

मूळचे बाभळेश्‍वर येथील रहिवासी असलेले बाळासाहेब राऊत काही वर्षांपासून मिठसागरे येथे कुटुंबासह वास्तव्यास असून, मेंढीपालन करून उदरनिर्वाह करतात. बुधवारी (ता. 19) त्यांची पत्नी शोभा राऊत (वय 38) व मुलगा गोविंद (19) हे दोघे पांगरी रस्त्यालगत, खळवाडीजवळील बंधाऱ्याजवळ मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. मेंढ्या चारत असतांना बंधाऱ्यात अंघोळ करण्याचा मोह झाल्याने गोविंद कपडे, मोबाईल काठावर ठेवत बंधाऱ्यात उतरला. मात्र, माती व चिखलामुळे तो घसरून खोल पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने जीव वाचविण्यासाठी त्याने आरडाओरड केली. त्यावेळी जवळच मेंढ्या चारत असलेली आई शोभा यांनी मुलाला वाचविण्यासाठी बंधाऱ्यात उडी मारली. मात्र, पोहता येत नसल्याने दोघेही बंधाऱ्यात बुडाले. दरम्यान, या घटनेनंतर राऊत यांच्या मेंढ्या तेथून काही अंतरावर असलेल्या गोरख कासार यांच्या कांद्याच्या शेतात शिरल्या. बराच वेळ होऊनही या मेंढ्यांच्या मागे मेंढपाळ नसल्याची बाब कासार यांनी हेरून त्यांनी मेंढ्यांच्या मालकाची शोधाशोध सुरू केली. तेव्हा या मेंढ्या गावातीलच काशीनाथ कांदळकर यांची बहीण म्हणजेच शोभा राऊत यांच्या असल्याचे समजल्यानंतर त्यांनी फोनवरून कांदळकर यांच्याशी संपर्क साधला. 

परिसरात शोध घेऊनही दोघा माय-लेकाचा शोध लागला नाही. त्यानंतर शोभा राऊत यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधत, जाम नदीकाठी फिरत असतांना त्यांच्या मोबाईलची रिंग ऐकू आली. त्या वेळी खड्ड्याजवळ शोध घेतला असता, काठावर कपडे व मोबाईल आढळला. संशय बळावल्याने कांदळकर यांनी खड्ड्यात उडी घेतली असता, माय-लेकाचे मृतदेह आढळले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com