Motivatinal Story : वडिलांना भाजी विक्रीच्या दुकानात मदत करत श्रद्धाला 93.80 टक्के

Sinner: Shraddha Jambukar with family.
Sinner: Shraddha Jambukar with family.esakal

Nashik News : कोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली कुटुंब पुण्यातून वावी सारख्या ग्रामीण भागात स्थलांतरित झाले.

शाळेचे वातावरण बदलले मात्र, या परिस्थितीला सामोरे जात वडिलांनी सुरू केलेल्या भाजीपाला विक्रीच्या दुकानावर मदत करत श्रद्धा जंबुकर हिने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

९३. ८० टक्के गुण मिळवून ती विद्यालयात पहिली आली. तर गणित विषयात तिला ९७ गुण मिळाले आहे. (Motivational Story 93.80 percentage in ssc exam to Shraddha with helping her father in vegetable shop Nashik News)

आई, वडील व दोघी बहिणी असे चौकोनी जंबुकर कुटुंब. मुळचे संगमनेर येथील, मात्र भोसरी पुणे येथे वास्तव्याला होते. २०२० मध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाउन मध्ये बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरीला असलेल्या ज्ञानदेव जंबुकर काम सोडावे लागले.

हाताला काम नसल्याने पुण्यात थांबून उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला. त्यात पुन्हा श्रद्धा व साक्षी या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची भविष्यातील परवड पाहता त्यांनी पुणे सोडण्याचा निर्णय घेतला.

भोसरी येथील चांगल्या शाळेत सातवीला शिकणारी श्रद्धा व साक्षी सिन्नर तालुक्यातील वावी येथे कुटुबांसोबत आजोळी राहायला आली. वावीला आल्यानंतर ज्ञानदेव यांनी गावातच भाजीपाला विक्रीचा स्टॉल थाटला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sinner: Shraddha Jambukar with family.
Nashik Political News : शिंदे गटाच्या माजी पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांचा आत्मदहनाचा इशारा

श्रद्धा हिने आठवीला रयत शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालयात प्रवेश घेतला. तर साक्षी जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली.

कुटुंबाची विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी ज्ञानदेव यांच्या बरोबरीने त्यांची पत्नी मनीषा हीने देखील घरातच शिवणकाम सुरू केले. मंगळवारच्या वावी येथील आठवडे बाजारात श्रद्धा वडिलांना दुकान सांभाळायला मदत करू लागली.

बरोबरीने शिक्षण देखील सुरू होते. नववीला गेल्यानंतर शाळा नियमित सुरू झाली. सुरवातीपासूनच हुशार असलेल्या श्रद्धाला नववीला ९३.८६ टक्के गुण मिळाले. दहावीच्या परीक्षेत त्यापेक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचा तिचा आत्मविश्वास वाढला. तिचे आता आयटी अभियंता बनण्याचे स्वप्न आहे.

Sinner: Shraddha Jambukar with family.
Nashik News : दारणा नदीत 2 जण बुडाले; महापालिकेचे अग्निशमन दलाचे; शोधकार्य सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com