

Nashik
esakal
नाशिक: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेमार्फत राबवीत असलेल्या भरती प्रक्रियेतील पदसंख्येत वाढ केली आहे. त्यामुळे आता या परीक्षेच्या माध्यमातून २६५ जागांवर भरती राबविली जाणार आहे. या वाढीव पदांमध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त/पोलिस उपअधीक्षक या पदाचा समावेश असला, तरी उपजिल्हाधिकारीपदाचा समावेश करण्यात आलेला नाही.