MPSC Exam : ‘MPSC’ची आजपासून मुख्य परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) जून २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुख्य परीक्षेस शनिवार (ता. २०)पासून प्रारंभ होत आहे.
MPSC main exam from today nashik news
MPSC main exam from today nashik newsesakal

MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) जून २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुख्य परीक्षेस शनिवार (ता. २०)पासून प्रारंभ होत आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या परीक्षेस ३४८ परीक्षार्थी प्रविष्ट असून, शालिमार येथील मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्यामंदिर येथे आसनव्यवस्था करण्यात आली आहे. (MPSC main exam from today nashik news)

‘एमपीएससी’तर्फे ४ जूनला राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली. यात प्रत्येकी २०० गुणांचे दोन पेपर घेण्यात आले. पहिल्या पेपरमध्ये ३३ टक्के गुण मिळवणारे परीक्षार्थी पुढील पेपरसाठी पात्र ठरले. सामाजिक ज्ञानावर आधारित या पेपरमध्ये शंभर प्रश्न विचारण्यात आले होते.

या परीक्षेतून पात्र ठरलेल्या ३४८ परीक्षार्थींची नाशिकमध्ये एकाच ठिकाणी परीक्षा होणार आहे. शनिवारी (ता. २०) सकाळी ९ ते १२ या वेळेत मराठी व इंग्रजी या विषयांचा वर्णनात्मक पेपर घेण्यात येईल. दुपारी ३ ते ४ यावेळेत बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा असेल.

MPSC main exam from today nashik news
MPSC Exam : एमपीएससीची पूर्व परीक्षा २८ एप्रिलला; २०२४ चे आंदाजित वेळापत्रक जाहीर

रविवारी (ता. २१) सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ४ यावेळेत जीएस-१ आणि जीएस-२ हे दोन पेपर घेतले जातील. सोमवारी (ता. २२) याच वेळेत जीएस-३ व जीएस-४ हे दोन पेपर घेतले जाणार आहेत.

परीक्षा केंद्रावर ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवस सुट्या जाहीर झालेल्या असल्या तरी या कर्मचाऱ्यांना सुटीचा लाभ घेता येणार नाही.

MPSC main exam from today nashik news
MPSC Exam: राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर, विनायक पाटील राज्यातून प्रथम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com