NMC News : महापालिकेचे प्रकल्प ठरतायेत ‘पांढरा हत्ती’; किमान देखभाल खर्चासाठी खासगी व्यवस्थापन

NMC News
NMC News esakal

NMC News : रस्ते, पाणी, आरोग्य व प्राथमिक शिक्षण या महापालिकेच्या जबाबदाऱ्या व्यतिरिक्त प्रकल्पांच्या माध्यमातून अन्य जबाबदाऱ्या लोकप्रतिनिधींनी वाढवून ठेवल्याने त्याचा परिणाम आता तिजोरीवर दिसून येत आहे.

महापालिकेने उभारलेले प्रकल्प पांढरा हत्ती पोसण्यासारखे होत असल्याने आता या प्रकल्पांचे व्यवस्थापन खासगीकरणाच्या माध्यमातून केले जाणार आहे. (Municipal Corporation did not have sufficient money for other projects nashik news)

महापालिकेकडून शहरात दादासाहेब फाळके स्मारक, तारांगण, कालिदास कलामंदिर, दादासाहेब गायकवाड सभागृह, प्रमोद महाजन उद्यान, पंडित पलुस्कर सभागृह, वेस्ट टू एनर्जी, खतप्रकल्प तसेच मोकळ्या भूखंडावर सामाजिक सभागृह उभारले आहेत. सभागृह उभारण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले.

मात्र आता हे प्रकल्प डोईजड ठरताना दिसत आहे. तारांगण प्रकल्प हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. विद्यार्थ्यांना भौगोलिक ज्ञानाची गोडी वाढावी हा त्यामागे उद्देश होता. परंतु हा प्रकल्प उद्‌घाटनाच्या पहिल्या महिन्यापासूनच तोट्यात आहे. विद्यार्थी आकर्षित करण्यासाठी उपाययोजना न केल्याने त्याचा परिणाम म्हणून हा प्रकल्प तोट्यात गेला.

दादासाहेब फाळके स्मारक प्रकल्प उभारण्यासाठी दहा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. सुरवातीचे चार वर्षे चांगले उत्पन्न मिळाले. परंतु फाळके स्मारकामध्ये आउटसोर्सिंगने कामे होऊ लागल्यानंतर प्रकल्प खड्ड्यात गेला. महापालिकेने खत निर्मिती प्रकल्प उभारला. पहिल्या वर्षी खत प्रकल्पातून २२ लाख रुपये उत्पन्न मिळाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC News
Nashik News : मुख्य निवडणूक कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धा; भरघोस पारितोषिक जिंकण्याची संधी

त्यानंतर, मात्र मार्केटिंगअभावी खत उचलले जात नसल्याने हा प्रकल्पदेखील तोट्यात गेला. वेस्ट एनर्जी हा प्रकल्प खासगीकरणातून उभारण्यात आला. मात्र ओला कचरा उपलब्ध होत नसल्याने प्रकल्प बंद करण्याची वेळ आली आहे. कलाप्रेमींच्या कलेला व्यासपीठ मिळावे यासाठी कायमस्वरूपी प्रदर्शन भरविण्यासाठी महात्मा फुले कलादालन उभारले.

मात्र प्रतिसादाअभावी कलादालन अनेकदा बंद दिसते. शहरात चार जलतरण तलाव आहे. तलावांवर जवळपास चार ते पाच कोटी रुपये खर्च होतो. मात्र उत्पन्न हे अवघे ३८ ते ४० लाख रुपये प्राप्त होते. त्यामुळे जलतरण तलाव बंद करण्याची वेळ आली आहे. एकीकडे प्रकल्पांची उभारणी व त्यावर होणारा खर्च वाढत असताना दुसरीकडे महापालिकेने जवळपास स्वमालकीच्या भूखंडावर जवळपास ९०० हून अधिक बांधव मिळकती उभ्या केल्या.

या मिळकतीच्या माध्यमातून समाजपयोगी कामे केली जात असल्याचे दर्शविले जात असले तरी त्यावरचा खर्च महापालिकेला परवडत नाही.

NMC News
Nashik NCP Job Fair : राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी सोमवारी नोकरी महोत्सव; येथे करा नावनोंदणी

महापालिकेचे प्रकल्प व मिळकतींचा आढाव नवीन आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी घेतल्यानंतर प्रकल्पांचे व्यवस्थापन खासगीकरणाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून देखभाल दुरुस्तीचा खर्च भरून काढण्याचे नियोजन आहे.

अशी आहे प्रकल्पांची स्थिती

प्रकल्प खर्च उत्पन्न (रुपये)

- दादासाहेब फाळके स्मारक ४० लाख आठ लाख

- तारांगण १० लाख सव्वा लाख

- जलतरण तलाव पाच कोटी चाळीस लाख

- खत प्रकल्प एक कोटी बावीस लाख

"महापालिकेच्या मोठ्या प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. किमान तोटा भरून निघणेदेखील गरजेचे आहे. त्यामुळे व्यवस्थापन खासगीकरणातून करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी व्यवहार्यता तपासली जात आहे." - डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

NMC News
Nashik News : ‘नांदूरची राणी’ पक्षी अभयारण्यात खातेय मासे; जांभळ्या पाणकोंबडीचे वर्तन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com