Nashik News : मुख्य निवडणूक कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धा; भरघोस पारितोषिक जिंकण्याची संधी

abhivyakti matanchi Competition by Chief Election Office nashik news
abhivyakti matanchi Competition by Chief Election Office nashik newsesakal

Nashik News : विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी करून घेण्याच्या दृष्टीने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ ही स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत सहभागी होता येणार आहे. (abhivyakti matanchi Competition by Chief Election Office nashik news)

महाविद्यालयाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेत ‘अभिव्यक्ती मताची’ याअंतर्गत जाहिरातनिर्मिती, भित्तिपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा होणार आहेत.

स्पर्धेत राज्यातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नालिझम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालय (आर्ट कॉलेजेस) यातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठी युवावर्ग आणि मताधिकारी, मताधिकारी लोकशाहीचा स्तंभ, एका मताचे सामर्थ्य, सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका/जबाबदारी, लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकार हे विषय असून, ही स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून होणार आहे.

जनसंज्ञापन, वृत्तपत्रविद्या आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन देशपांडे यांनी केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

abhivyakti matanchi Competition by Chief Election Office nashik news
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव मंडळांसाठी खुशखबर! राज्य शासनाकडून लाखोंची पारितोषिके जिंकण्याची संधी

पारितोषिकाचे स्वरूप

जाहिरातनिर्मिती स्पर्धा : पहिले पारितोषिक- रुपये एक लाख, दुसरे पारितोषिक- ७५ हजार, तिसरे पारितोषिक- ५० हजार आणि प्रत्येकी दहा हजारांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील

भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेत पहिले पारितोषिक ५० हजार, दुसरे पारितोषिक- २५ हजार, तिसरे पारितोषिक- दहा हजार आणि प्रत्येकी पाच हजारांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके.

घोषवाक्य स्पर्धा : पहिले पारितोषिक- २५ हजार, दुसरे पारितोषिक- १५ हजार, तिसरे पारितोषिक- दहा हजार आणि प्रत्येकी रुपये पाच हजारांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके असतील.

अधिक माहितीसाठी 9820374093, 8669058325 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

abhivyakti matanchi Competition by Chief Election Office nashik news
Crop Competition : देखण्या पिकांवर होणार बक्षिसांची खैरात! कृषी विभागाकडून पीक स्पर्धा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com