Nashik News : ‘नांदूरची राणी’ पक्षी अभयारण्यात खातेय मासे; जांभळ्या पाणकोंबडीचे वर्तन

purple hen eating fish in nandur madhyameshwar Bird Sanctuary nashik news
purple hen eating fish in nandur madhyameshwar Bird Sanctuary nashik newsesakal

Nashik News : नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यातील ‘नांदूरची राणी’ म्हणून ओळखली जाणाऱ्या जांभळ्या पाणकोंबडीच्या वर्तनात बदल पाहावयास मिळत आहे.

पक्षीमित्रांच्या निरीक्षणामध्ये जांभळी पाणकोंबडी सहा इंच आकाराच्या मरळ माशांची शिकार करून या पक्ष्यांच्या समूहाने फस्त केल्याचे आढळून आले.

वातावरण बदलामुळे पक्षी राहणीमानात बदल करून नैसर्गिक खाद्य सोडून परिस्थितीशी जुळवून घेत असल्याची ही धक्कादायक स्थिती पक्षीमित्रांना पाहावयास मिळाली. (purple hen eating fish in nandur madhyameshwar Bird Sanctuary nashik news)

इथे बारमाही वास्तव्यास असलेली जांभळी पाणकोंबडी पक्षीप्रेमींचा आवडता पक्षी आहे. दलदलीच्या प्रदेशामुळे बरेच पक्षी आकर्षित होतात. त्यातील हा एक आहे. हा पक्षी आकाराने कोंबडीएवढा असतो. जांभळट, निळ्या रंगाचा असतो. लांब तांबडे पाय, पायांची बोटे लांब असतात. कपाळ तांबडे आणि त्यावर पिसे नसतात.

चोच लहान, जाड व लाल रंगाची असते. शेपटीखाली पांढऱ्या रंगाचा डाग असतो. शेपटी खाली-वर हलविण्याच्या सवयीमुळे हा डाग ठळक दिसतो. नर-मादी दिसायला सारखे असतात. जोडीने अथवा मोठ्या समूहात हे पक्षी पाहावयास मिळतात. टक्कल असलेल्या डोक्यावर लाल रंगाचे ठिपके असलेले चमकदार जांभळे आणि किनाऱ्याच्या रेषेत अथवा नखांमध्ये लांब लाल पाय आणि लाल रंगाची चोच, अशी तिची ओळख होते.

जांभळी पाणकोंबडी हा पक्षी लाजाळू आहे. पाणवेली आणि कमळाचे कंद हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. कधी हे पक्षी कीटक, गोगलगाय खातात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

purple hen eating fish in nandur madhyameshwar Bird Sanctuary nashik news
Nashik NCP Job Fair : राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी सोमवारी नोकरी महोत्सव; येथे करा नावनोंदणी

जांभळी पाणकोंबडीच्या समूहाने मासा खाताना माशांच्या आतील भागातील मांस खात असल्याचे पक्षीमित्रांच्या दृष्टीस पडले. त्यामुळे लाजाळू पक्ष्यांची अधिक सवयी शोधण्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे, असे पक्षीमित्रांना वाटते.

या पक्ष्यांचा एकमेव धोका म्हणजे, स्थिर पाण्याचे प्रदूषण होय. नाशिकमधून प्रदूषित पाणवेली अभयारण्यात वाहून येतात. त्यामुळे प्रदूषित कंद हे पक्षी खात नसावे. परिणामी, त्यांनी मासे खायला सुरवात केली काय? याच्या अभ्यासाची गरज आहे. दरम्यान, हा पक्षी देशात मोठ्या प्रमाणात आढळतो. शिवाय भारतीय उपखंड, श्रीलंका, अंदमान आणि निकोबार बेटात निवासी आहे. स्थानिक स्थलांतर करतो. त्याची वीण जून ते सप्टेंबरमध्ये होते.

"पाळीव कोंबड्या छोटे मासे खातात. पण मोठे मासे खाण्याची रचना त्यांच्या शरीराची नसते. जांभळी पाणकोंबडीला तिचे खाद्य मिळत नसल्याने तिने परिस्थितीशी जुळवून घेऊन मासे खाण्यास सुरवात केली असावी. ही घटना पर्यावरणदृष्ट्या धोक्याची घंटा आहे. मासे खाल्ल्याने या पक्ष्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होता का? हे तपासावे लागणार आहे." - डॉ. संजय गायकवाड, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, छत्रपती संभाजीनगर

purple hen eating fish in nandur madhyameshwar Bird Sanctuary nashik news
Nashik News : मुख्य निवडणूक कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धा; भरघोस पारितोषिक जिंकण्याची संधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com