Nashik News: पाइपलाइन फुटण्याची भीती दाखवून 40 लाख खर्चाचा बार

pipeline
pipeline

Nashik News : गंगापूर धरण ते शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत साडेबारा किलोमीटर लांबीची लोखंडी पाइपलाइन टाकण्यासाठी २११ कोटी रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे प्रलंबित असताना आता जुन्या सिमेंट पाइपलाइनवर महापालिकेकडून जवळपास चाळीस लाख रुपये खर्च देखभाल व दुरुस्तीसाठी केला जाणार आहे. (municipal corporation will spend nearly 40 lakh rupees for maintenance and repair of pipeline nashik news)

आर्थिक वर्ष संपत आले असताना देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली होणारा चाळीस लाख रुपयांचा खर्च करताना सिमेंटची पाइपलाइन फुटल्यास संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद होईल, अशी भीती दाखवली जात आहे.

सातपूर विभागातील गंगापूर धरणातून बाराशे मिलिमीटर व्यासाची अशुद्ध पाण्याची पाइपलाइन गंगापूर धरण ते गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जोडण्यात आली आहे. जवळपास २५ वर्षांपासून कार्यान्वित असलेली सिमेंट पाइपलाइन चोवीस तास कार्यान्वित आहे. या पाईपलाईनमधून चोवीस तास जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत पाणी पोचविले जाते.

या पाइपलाइनला गळती झाल्यास बारा बंगला, पंचवटी विभागातील जलशुद्धीकरण केंद्र तसेच गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राच्या अखत्यारीतील पाणी वितरण व्यवस्था विस्कळित होते. त्याचप्रमाणे कार्बन नाका येथून ५०० मिलिमीटर व्यासाची सिमेंट पाइपलाइन आहे.

pipeline
NMC News: सिंहस्थ खर्चाचे लेखा परिक्षणावर लक्षवेधी! मनपा अधिकाऱ्यांचे दणाणले धाबे, हिशेबच ठेवला नसल्याची बाब

या पाईपलाईनद्वारे गोपीनाथ मुंडे, बळवंतनगर, गणेशनगर, रामराज्य व नाहुष जलकुंभ भरले जातात. बाराशे व पाचशे मिलिमीटर अशा दोन्ही सिमेंट पाइपलाइनवर पाणी गळती झाल्यास सातपूर विभागातील धृवनगर, कॅनॉल रोड, सिरीन मेडोज, पाइपलाइन रोड, गणेश नगर, सोमेश्वरनगर ते आनंदवली तसेच जुने गंगापूर रोड पंपिंगपर्यंतचा पाणीपुरवठा खंडित होतो.

१२०० मिलिमीटर सिमेंट पाइपलाइन व शुद्ध पाण्याची बाराशे व पाचशे मिलिमीटर व्यासाची सिमेंट पाइपलाइनवर दैनंदिन देखभाल दुरुस्तीची कामे करून पाणी गळती बंद करणे आवश्यक आहे. गळती दुरुस्ती न केल्यास लाखो लिटर पाणी वाया जाऊन पाणीपुरवठा विस्कळित होऊन त्याचा वितरणावर मोठा परिणाम होत असल्याने तातडीने काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी ३९ लाख ५८ हजार रुपये पाइपलाइन दुरुस्ती शीर्षकातून खर्च करण्यासाठी महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

pipeline
Nashik News: मालेगावला लवकरच पोलिस आयुक्तालय; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com