कार सर्व्हिसेस संचालकाची धारदार शस्त्राने निर्घूण हत्या; परिसरात खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gurukrupa.jpg

कामगार आकाश सकाळी कामावर येताच समोर दिसली मालकाची डेड बॉडीच. पळत रस्त्यावर येत त्याने प्रकार नागरिकांना सांगितला. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. 

कार सर्व्हिसेस संचालकाची धारदार शस्त्राने निर्घूण हत्या; परिसरात खळबळ

sakal_logo
By
राजेंद्र बच्छाव

नाशिक : (इंदिरानगर) कामगार आकाश सकाळी कामावर येताच समोर दिसली मालकाची डेड बॉडीच. पळत रस्त्यावर येत त्याने प्रकार नागरिकांना सांगितला. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. 

असा आहे प्रकार

इंदिरानगरमधील वडाळा-पाथर्डी रस्त्यावर असलेल्या श्री गुरुकृपा कार सर्व्हिसेसचे संचालक रामचंद्र रामपराग निषाद (वय ३७, रा.उत्तर प्रदेश) यांच्या डोक्यावर हत्याराने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ माजली. मेट्रो झोनसमोर असलेल्या या गॅरेजमध्येच ते वास्तव्यास होते. आज गुरुवारी (ता. 12) सकाळी दहा वाजेच्या सुमारास येथे काम करणारा आकाश पवार हा युवक आल्यानंतर त्याला चारचाकी धुण्याच्या रॅम्पवर निषाद यांना डोके फुटलेल्या अवस्थेत पडल्याचे पाहिले. गॅरेजचे भागीदार मुरगन सिगमनी आणि आसपासच्या नागरिकांच्या मदतीने पोलिसांना कळविण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांनी येथे भेट देत तातडीने तपासाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

हेही वाचा > भाजप नेत्याच्या वाढदिवसाचा भररस्त्यात जल्लोष! पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

loading image
go to top