Crime Alert : बहिणीकडून भावाचा खून; शिवीगाळ केल्यामुळे रागातून कृत्य

Murder Case News
Murder Case News esakal

मनमाड (जि. नाशिक) : दारूच्या नशेत भावाने बहिणीला शिवीगाळ केल्यामुळे आलेल्या रागातून बहिणीने भावाला चाकू मारल्याने झालेल्या रक्तस्त्रावात भावाचा जागीच मृत्यू (Death) झाला. ही घटना शहरातील विवेकानंदनगर क्रमांक २ भागात घडली. संदीप ऊर्फ बाळू भगवानराव गोंगे (वय ४५) असे मृत भावाचे नाव आहे. भावाचा खून (Murder) झाल्याने बहिणीने स्वतःहून पोलिस ठाण्यात जाऊन कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

येथील विवेकानंदनगर २ भागात संदीप ऊर्फ बाळू गोंगे राहत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची श्रीरामपूर येथे राहणारी बहीण शोभा गारुडकर हिची मुलगी वारली होती. त्यामुळे शोभा या काही दिवस आपल्या आईकडे राहायला आल्या होत्या. भाऊ बाळू सतत दारूच्या (Alcohol) नशेत असायचा. आजही तो दारू पिऊन आल्यामुळे त्याने घरात बहिणीला शिवीगाळ केली. दोघांचे भांडण झाले. शिवीगाळ केल्याचा राग आल्यामुळे बहिणीने भावाला किचनमधील चाकू आणून धाक दाखवीत होती. मात्र, या धाक दाखविण्याच्या नादात बहिणीच्या हातातील चाकू भावाच्या पोटात घुसल्यामुळे तो आरपार गेला. वर्मी घाव लागल्याने रक्तस्राव जास्त झाला आणि भावाचा जागीच मृत्यू झाला. भावाचा आपल्या हातून खून झाल्यामुळे बहीण शोभा गारुडकर (वय ५५, रा श्रीरामपूर) यांनी थेट पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला.

Murder Case News
नाशिक : मालमत्ता धारकांना एप्रिल अखेरपर्यंत 5 टक्‍यांची सूट

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. प्रभारी पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते तपास करीत आहेत

Murder Case News
नाशिक : महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांच्या राजकीय भाषणावर निर्बंध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com