Muslim Janakrosh Morcha : ‘मुस्लिम जनआक्रोश’ स्थगित; अमन रॅलीतून देणार एकतेचा संदेश

Muslim Morcha : अल्पसंख्याक काँग्रेसतर्फे शुक्रवारी (ता. १६) काढण्यात येणारा ‘मुस्लिम जनआक्रोश’ मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.
Muslim Janakrosh Morcha postpond
Muslim Janakrosh Morcha postpondesakal

Muslim Janakrosh Morcha : अल्पसंख्याक काँग्रेसतर्फे शुक्रवारी (ता. १६) काढण्यात येणारा ‘मुस्लिम जनआक्रोश’ मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. ‘वक्फ कायदा १९९५चे संरक्षण समर्थनार्थ व शहरात मुस्लिम तरुणांवर झालेल्या पक्षपाती कारवाईच्या निषेधार्थ’ हा मोर्चा निघणार होता.

आता शिवजयंतीनंतर मोर्चाऐवजी सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी अमन रॅली काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Muslim Janakrosh Morcha postpond )

अल्पसंख्याक काँग्रेसच्या वतीने रविवारी ‘मुस्लिम जनआक्रोश मोर्चा’ निघणार होता. परंतु पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्याच दिवशी सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला होता. परंतु पोलिसांनी मोर्चा न काढण्याच्या आवाहनास अल्पसंख्याक सेलने सकारात्मक प्रतिसाद दिला.

Muslim Janakrosh Morcha postpond
Hindu Janakrosh Morcha: हिंदू मुलींनो जाग्या व्हा, राक्षसाला ओळखा! येवल्यात लव्ह जिहादच्या विरोधात मोर्चा

त्यामुळे मोर्चा स्थगित करीत तो शुक्रवारी काढण्यात येणार होता. यासंदर्भात पुन्हा पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि शहर ए खतीब यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त बैठक पार पडली. त्यामध्ये सदर मोर्चा काढण्याऐवजी शिवजयंतीनंतर सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी अल्पसंख्याक काँग्रेस सेलतर्फे अमन रॅली काढण्यात येणार, असा निर्णय घेण्यात आला.

गेल्या काही दिवसांमध्ये ठराविक कारणांवरून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. तसे न होता सामाजिक एकोपा टिकून ठेवण्यासाठी अमन रॅली शिवजयंतीनंतर काढण्यात येणार आहे.

Muslim Janakrosh Morcha postpond
Hindu Janakrosh Morcha: आज पुण्यात हिंदु जनआक्रोष मोर्चा; लाल महालापासून होणार सुरुवात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com