Nashik Fraud Crime : बनवाट खरेदीखत करून जमिनीची परस्पर विक्री; दोघांवर गुन्हा

Fake Documents
Fake Documents esakal

Nashik Fraud Crime : लासलगावजवळील खडक माळेगाव येथील गायरान जमिनीच्या मूळ मालकांना अंधारात ठेवून बहिणीचे हक्कसोड पत्र तयार करून व बनावट खरेदी खत तयार करून जमीन परस्पर गोखले एज्युकेशन सोसायटीला विक्री केल्याप्रकरणी कैलास रामभाऊ रायते यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारभारी रायते व उत्तम रायते या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (Mutual sale of land by fake purchase crime against both Nashik Fraud Crime news)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Fake Documents
Jalgaon Crime News : 43 मोबाईलसह 4 अल्पवयीन गुन्हेगारांना अटक

फिर्यादीचे वडील रामभाऊ हे १९८५ ते ८६ च्या दरम्यान गावातून निघून गेले. त्याचा गैरफायदा घेऊन गट क्रमांक ८७ क्षेत्र ४० हेक्टरचा कारभारी रामभाऊ रायते यांनी शंभर रुपयांच्या १९९७ सालच्या कालबाह्य स्टॅम्पचा वापर करून बहीण नर्मदाबाई संधान व रखमाबाई पानगव्हाणे या सख्ख्या बहिणी असल्याचे भासवून खोटी माहिती लिहून बनावट हक्क सोडपत्र खडक माळेगाव येथील कारभारी रामभाऊ रायते यांनी केले.

उत्तम विश्वनाथ रायते यांच्या नावाने हक्क सोड न करता तत्कालिन खडक माळेगावचे तलाठींकडून २६ जून १९९८ ला नाव लावले. दोघांनी हे क्षेत्र २०१२ मध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नावाने विक्री केले.

अशा आशयाची फिर्याद कैलास रामभाऊ रायते यांनी लासलगाव पोलिसात दिली आहे. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस उपनिरीक्षक अजिनाथ कोठाळे तपास करत आहे.

Fake Documents
Crime news nagpur : शारीरिक सुख न देता करतो मानसिक छळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com