वणीत नाफेडतर्फे कांदा खरेदी सुरू : शेतकऱ्यांना होणार लाभ

NAFED-starts-buying-onions-in-vani
NAFED-starts-buying-onions-in-vaniesakal

वणी (जि. नाशिक) : चांगला दर देऊन जास्तीत जास्त माल खरेदी करून पारदर्शी कामकाज राखण्यासाठी नाफेडने पोर्टल सुरू करण्याची सूचना खासदार डॉ. भारती पवार यांनी केली आहे. वणी उपबाजार आवारात मंगळवार (ता. २२)पासून नाफेड व महाराज्य ग्रुपअंतर्गत कांदा खरेदीचा प्रारंभ खासदार डॉ. भारती पवार यांच्या हस्ते झाला. त्या वेळी त्या बोलत होत्या. (NAFED-starts-buying-onions-in-vani-nashik-agriculture-news)

स्थानिक बाजारपेठेला चालना

वणी-सापुतारा रस्त्यावरील उपबाजार आवारात मंगळवारी सकाळी अकराला नाफेडतर्फे खासदार डॉ. भारती पवार यांनी नारळ वाढवून कांदा लिलावास प्रारंभ केला. नाफेडकडून कांदा खरेदी सुरू झाल्यामुळे वणी, कळवण तालुक्यातील, देवळा, सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्यात याअगोदर लासलगाव व पिंपळगाव येथे नाफेड एजन्सीकडून कांदा खरेदी केली जात होती. खासदर पवार यांच्या पाठपुराव्याने वणी येथे ही नाफेड कांदा खरेदी सुरू झाली.

NAFED-starts-buying-onions-in-vani
नाशिकमध्ये बसच्या ट्रायल रनला सुरवात; शहरात धावल्या 10 बस

पैसे २४ तासांच्या आत खात्यात होणार जमा

मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सुमारे दीड लाख टन कांदा नाफेड खरेदी करणार असून, खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची कांदा खरेदी झाली आहे, त्यांचे पैसे लगेच २४ तासांच्या आत त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होईल. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या योजना आल्या आहेत, त्याचा योग्य अभ्यास करून त्याचा फायदा घ्यावा. शेतकऱ्यांनी कृषी कायद्याचा आधार घेऊन आपल्या शेतमालाची विक्री करावी, असे आवाहन खासदार डॉ. पवार यांनी केले.

NAFED-starts-buying-onions-in-vani
सीबीएससीप्रमाणे लावा बारावीचा निकाल; शिक्षणमंत्र्यांना पत्र

२,९०० रुपयांचा भाव

सुरवातीलाच कांद्याला २७०० ते २९०० रुपयांचा भाव मिळाला. यामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले. कळवण व अभोण्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांना नाफेडमध्ये कांदा विक्रीसाठी पिंपळगाव किंवा लासलगाव येथे जावे लागायचे. वणीत नाफेडकडून खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांची वाहतूक खर्च व वेळेची बचत होणार आहे. वणी उपबाजारात कांद्याची आवकही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. याचा फायदा स्थानिक बाजारपेठेत चांगला दिसून येईल.

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव पाटील, सभापती दत्तात्रय पाटील, उपसभापती अनिल देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, नाफेडचे अधिकारी शैलेंद्र कुमार, सुशीलकुमार, पंचायत समिती सदस्य उत्तमराव जाधव, म्हेळुस्केचे सरपंच योगेश बर्डे, मनीष बोरा, शिवाजी पिंगळे, वसंतराव जाधव, सुभाष मेधणे, पंडितराव बागूल, नंदलाल चोपडा, अमित चोरडिया, गुलाबराव जाधव, डॉ. टिळेकर, कुंदन झावरे आदी उपस्थित होते.

(NAFED-starts-buying-onions-in-vani-nashik-agriculture-news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com