Nashik News : सारूळ खाणप्रकरणी नगरच्या पथकाच्या अहवालाकडे लक्ष

Crime News
Crime Newsesakal

नाशिक : सारूळ (ता.नाशिक) येथील उत्खननाच्या चौकशीसाठी आलेले त्रयस्थ नगर जिल्ह्यातील पथकाने जागेवर येत चौकशी केली.

आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती सादर करण्याच्या सूचना देत पथक परतले आहे. दरम्यान या पथकाच्या अहवालानंतर काय कारवाई होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सारुळ, राजूर बहुला परिसरातील अनधिकृत गौणखनिज उत्खननावर कारवाईस जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ सुरू असल्याने महसूल विभागाने त्रयस्थ अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरू केली आहे.

मुदत संपल्यानंतरही होणारे क्रशिंग, परवानगी एका जागेची खोदाई भलतीकडेच, डोंगर भुईसपाट करत निसर्गाची हानी यासह नानाविध मुद्द्यावर चौकशी होणार असल्याचे समजते. (Nagar in Sarul mining case Attention to report of team Nashik News)

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

Crime News
Nashik News : व्यापाऱ्यांकडून लॉबिंगद्वारे द्राक्ष उत्पादकांचा घात! वातावरण बदलाचे फुसके कारण

अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी नियमबाह्य डोंगर पोखरल्याच्या आरोपावरून सप्टेंबरमध्ये २१ खाणपट्टयांवरकारवाई करीत खाणी बंद केल्या. त्यापैकी १९ खाणपट्टे सारूळ येथील असताना प्रशासकीय बाब आणि तातडीची निकड म्हणून गौणखनिज व त्याविषयक बाबींचे कामकाज स्वत:कडे घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी घेतला.

पण सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यन्त खानपट्टे सुरु करण्याचे आदेशही दिले. दुसरीकडे संबंधित शेतकऱ्यांनी आझाद मैदानावर उपोषण केले. त्यामुळे आता या प्रकऱणात महसूलमंत्री विखे पाटील यांनी लक्ष घातले आहे.

मुदत संपल्यानंतरही होणारे क्रशिंग, परवानगी एका जागेची खोदाई भलतीकडेच, डोंगर भुईसपाट करत निसर्गाची हानी यासह नानाविध मुद्द्यावर त्यांनी चौकशीच्या सूचना नगरच्या पथकाला केल्याचे सांगण्यात येते.

Crime News
Satara News: साताऱ्यात रुजतेय गुन्हेगारीची नवी संस्कृती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com