Nampur APMC : नामपूर बाजार समितीच्या नोकर भरतीला स्थगिती

order
orderesakal

Nampur APMC : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध पदांसाठी सुरू असलेल्या कथित नोकर भरती प्रकियेला जिल्हा निबंधक एस.वाय.पुरी यांनी स्थगिती दिली आहे.

याबाबत बाजार समिती सभापती कृष्णा भामरे यांनी सहकार मंत्री, पणन संचालक, जिल्हा निबंधक यांच्याकडे लेखी तक्रार केल्याने सहकार खात्याने नोकर भरतीला स्थगिती दिली आहे. (Nampur Bazar Samiti Recruitment Suspended nashik news)

बाजार समितीमधील नोकर भरती प्रक्रिया सुरवातीपासून संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे. विद्यमान संचालक मंडळाकडून 'अर्थपूर्ण' घडामोडीतून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे.

यामुळे मोसम खोऱ्यातील बेरोजगार शेतकरी तरुणांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे सदर भरती प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, अशी मागणी बाजार समितीचे सभापती, प्रगतशील शेतकरी कृष्णा भामरे यांनी केली आहे.

नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यालयीन कामकाजासाठी १६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून सदर प्रक्रियेत होत असणाऱ्या कामकाजामध्ये विद्यमान संचालक मंडळातील काही संचालकांचे नातेवाईक यांना नियमबाह्य पद्धतीने सदर प्रक्रियेत नोकरीत पात्र ठरवून रिक्त जागांवर संचालकांच्या नातेवाइकांना नियुक्त करण्याचा घाट घातला जात आहे. सदर रोजंदारी कर्मचाऱ्यांची यादीही निवेदनासोबत जोडल्याचे सभापती भामरे यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

order
Kalavan APMC : कळवण बाजार समिती सभापतीपदी धनंजय पवार! दत्तू गायकवाड उपसभापती

बाजार समितीत काम करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आजपर्यंत कोणतेही हजेरीपत्रक तयार केलेले नाही. परंतु त्यांचे पगार व्हाऊचरद्वारे अदा करण्यात येत आहेत. सदर रिक्त पदांच्या भरतीसाठी सहकार प्रशिक्षण केंद्र नाशिक या संस्थेबरोबर पदभरती प्रक्रिया राबविण्याचा करारनामा करण्यात आला आहे.

सदर रिक्त पदांवर अनेक पात्र उमेदवारांनी अर्ज केले असून त्यांची परिक्षा नाममात्र पद्धतीने घेण्यात आली आहे. अशा भ्रष्ट पद्धतीने होत असलेल्या पदभरती प्रक्रियेमुळे पात्र मुले नोकरीपासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे.

"नामपूर बाजार समितीमधील नोकरभरतीच्या पार्श्वभूमीवर सभापती यांच्या अर्जानुसार सरळसेवा नोकरभरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. याबाबतचे आदेश बाजार समिती प्रशासनाला देण्यात आले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित राहील."

-एस.वाय.पुरी, जिल्हा निबंधक,

"बाजार समितीवर तातडीने प्रशासकांची नियुक्ती करण्यात यावी. त्यानंतर तातडीने शासन नियमानुसार पद भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. सदर भरती प्रकियेत अनेक संचालकांनी मुलगा, भाचा, नातू आदींच्या रोजगारासाठी पदाचा गैरवापर केला आहे."

-कृष्णा भामरे, सभापती नामपूर बाजार समिती

order
Kalavan APMC : कळवण बाजार समिती सभापतीपदी धनंजय पवार! दत्तू गायकवाड उपसभापती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com