Nashik News : नामपूर बसस्थानक असुविधांच्या विळख्यात

nampur bus stand
nampur bus standesakal

नामपूर (जि.नाशिक) : येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या (Bus stand) आवारात पसरलेली प्रचंड दुर्गंधी, आवारातील डांबरीकरणाचे अर्धवट काम, बसस्थानकाच्या आवारात खासगी व्यावसायिकांचे झालेले अतिक्रमण, प्रवेशद्वारासमोर असणाऱ्या खड्ड्यांमुळे दणक्यात होणारे प्रवाशांचे स्वागत, पिण्याच्या पाण्याची टंचाई, मोकाट जनावरांचा त्रास आदी बाबींमुळे येथील बसस्थानक असुविधांच्या विळख्यात सापडले आहे. (Nampur bus station is in bad condition nashik news)

त्यामुळे एसटी प्रशासनाने याबाबत दखल घेऊन सुधारणा करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था

बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ अनेक वर्षांपासून बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाच्या उद्‌घाटनचा एसटी प्रशासनाला विसर पडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सदर स्वच्छतागृहाच्या देखभालीसाठी मनुष्यबळ नसल्याने काटेरी बाभळीच्या विळख्यात गडप झाले आहे.

महिलांच्या स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था झाल्याने महिला प्रवाशांना अत्यंत लाजिरवाण्या स्थितीत अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. परिसरातील दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एसटी प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घेऊन समस्या सोडवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

प्रवाशांच्या संयमाचा अंत

बसस्थानकाच्या आवारात असणाऱ्या उघड्या गटारीमुळे पसरलेली दुर्गंधी, आवारात वाढलेल्या काटेरी बाभळी, मोकाट जनावरांचा मुक्त संचार, यामुळे बसस्थानकाची कचराकुंडी झाली आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने प्रवासी संतप्त आहेत. एसटी प्रशासनाने प्रवाशांच्या संयमाचा अंत न पाहता लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

nampur bus stand
Recertification Meters : रिक्षा मीटर पुन:प्रमाणिकरणास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

गटाराचे अर्धवट बांधकाम

मोसम खोऱ्याची मध्यवर्ती व्यापारी बाजारपेठ म्हणून शहराचा विकास होत आहे. भविष्यातील तालुका म्हणूनही नामपूरकडे पाहिले जाते. परिसरातील ३० ते ३५ खेड्यांच्या सहवासामुळे दिवसभर प्रवाशांची बसस्थानकात वर्दळ असते. परंतु, बसस्थानकात प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत आहे.

बसस्थानकात प्रवेश करतानाच वर्षानुवर्षे स्वच्छ न झालेल्या गटारींच्या दुर्गंधी व खड्ड्यांमध्ये बस जाताच मिळणाऱ्या दणक्यांनी प्रवाशांचे स्वागत होते. बसस्थानकासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने आरसीसी गटाराचे अर्धवट बांधकाम केले आहे.

बसस्थानकाच्या आवारातील गटारी भूमिगत कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे. बसस्थानकाच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून काटेरी बाभळी वाढल्या आहेत.

nampur bus stand
Nashik News : वाहन स्मार्टकार्डची जीवघेणी प्रतीक्षा! नाशिक विभागात खासगी कंपनीच्या कामाचा नागरिकांना फटका

आवारात मोकाट जनावरांचा मुक्त संचार असल्याने अस्वच्छतेत भर पडली आहे. परिसरातील नागरिक कचरा फेकण्यासाठी अनेक जण बसस्थानकाची निवड करत असल्याचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीत गेल्या अनेक वर्षांपासून पाणी नसल्याने विकतचे पाणी घेऊन नागरिकांना आपली तहान भागवावी लागत आहे.

"नामपूर बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु, प्रत्यक्षात निधी न मिळाल्याने अडचणी वाढल्या आहेत. आवारातील डांबरीकरणाचे काम रखडलेले आहे. शहराचे व्यापारी महत्त्व लक्षात घेता आवारात व्यापारी संकुल उभारून सुशिक्षित बेरोजगारांना त्याचा लाभ मिळावा. बसस्थानकाच्या आवारात असणारे पथदीप बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सायंकाळी सव्वासहानंतर सटाणा, मालेगाव येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध व्हाव्यात." -गणेश खरोटे, मोसम प्रतिष्ठान

nampur bus stand
Tomato Cultivation : टमाटा लागवडीमुळे मल्चिंग पेपरला महत्त्व; कांद्याला फाटा अन् टमाटा लागवड जोमात!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com