पप्पा, किती वेळ झोपणार, कधी येणार! चिमुकल्या हरीशच्या उद्‌गाराने उपस्थितही भावुक

चिचोंडी बुद्रुक येथील भूमिपुत्र नारायण मढवई यांना हिसार (हरियाणा) येथे गुरुवारी (ता.१०) ड्युटीवर जातांना वीरमरण आले.
Krishna and Harish
Krishna and HarishSakal
Summary

चिचोंडी बुद्रुक येथील भूमिपुत्र नारायण मढवई यांना हिसार (हरियाणा) येथे गुरुवारी (ता.१०) ड्युटीवर जातांना वीरमरण आले.

चिचोंडी - आपले वडिल (Father) आता आपल्याला कायमचे सोडून गेले याची पुसटशीही कल्पना वीरमरण (Martyr) प्राप्त झालेले नारायण मढवई (Narayan Madhwai) यांचा लहान मुलगा हरीश (Harish) याला नसावी. वडिलांचे पार्थिव घरी आल्यानंतर मुखदर्शनासाठी खोललेल्या शवपेटीत डोकावत हरीश याने पप्पा, तुम्ही कधी येणार ?असा पप्पांना आवाज दिला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. या भावुक क्षणी सैनिकांना (Jawan) देखील आपले अश्रू लपवता आले नाही.

चिचोंडी बुद्रुक येथील भूमिपुत्र नारायण मढवई यांना हिसार (हरियाणा) येथे गुरुवारी (ता.१०) ड्युटीवर जातांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव आज चिचोंडी या जन्मगावी आले. शासकीय इतमामात हा अंत्यविधी पार पडण्यापूर्वी पार्थिव घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी मेजर नारायण मढवई यांचा चिमुकला मुलगा हरीश याने अंतिम दर्शन घेताना पप्पांचा चेहरा पाहून पप्पा, तुम्ही किती वेळ झोपणार, घरी कधी येणार, असा आवाज दिला अन साऱ्यांचेच डोळे हा आवाज ऐकताच पाणावले.

Krishna and Harish
नगरसेविकेने हळदी-कुंकूनिमित्त चक्क सोन्याच्या अंगठ्याच वाण म्हणून दिल्या

माजी सैनिक अरुण कोकाटे यांनी हे दृश्य बघताच नातेवाईकांना बाजूला घेतले. मोठा मुलगा कृष्णा याने भारत माता की जय असे म्हणून पप्पा तुमची जागा मी घेईल असे म्हणत देश सेवेबद्दल आपले इरादेच जणू स्पष्ट केले. अतिशय भावुक झालेल्या पत्नी सोनाली यांना आणि संपूर्ण कुटुंब नातेवाईक यांना अश्रू अनावर झाले. आरमाड व मिलिटरी अधिकारी व जमलेल्या महिला पोलिसांना देखील अश्रू लपवता आले नाही.

सोनालीताईंना सॅल्यूट...

वीरमरण आलेले नारायण मढवई यांच्या पत्नींना अश्रू अनावर होताना हुंदके येत होते. त्या पार्थिवासोबत असल्याने या विरपत्नीच्या हिमतीचे कौतुक झाले. रडून रडून जणू त्यांचे अश्रू संपले पण देशासाठी गेलेले पतीचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. मुलांना मोठे करून देशसेवेसाठी पाठविन असे त्यांनी म्हटले. विरपत्नी सोनालीताईंच्या हिमतीला उपस्थितांतीनी मानाचा सॅल्यूट केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com