नारोशंकराची घंटा : अतिशहाणे, सुशिक्षित असेच
‘अती शहाणा त्याचा बैल रिकामा’ या वाक्याचा प्रत्यय गंजमाळ सिग्नल येथे आला. शालीमारकडून नाशिकरोडकडे जाणाऱ्या मार्गावरील सिग्नल सुरू होता.
सूज्ञ नागरिकांनी सिग्नलचा लाल लाईट बघून आपले वाहन थांबवून होते. त्या वाहनांच्या मागे एक प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या महागड्या चारचाकीत बसून सारखे हॉर्न वाजवत होता. सिग्नल सुरू असल्याने सर्वच वाहने थांबून होते.
जोपर्यंत सिग्नल सुटणार नाही, तोपर्यंत वाहन पुढे जाणार नाही. तरीही ती व्यक्ती सारखे हॉर्न वाजवून ध्वनीप्रदूषण तर करतच होता. शिवाय इतरांना त्रास देत होता. अशात सिग्नलवर थांबलेल्या एका दुचाकी चालकांने त्याच्या सहकारी मित्रास सांगितले. (Naro Shankarachi ghanta comedy tragedy politics crime traffic signal Nashik News)
उगाच कारण नसताना हा व्यक्ती का हॉर्न वाजवत असावा.? मित्राने चटकन उत्तर दिले,‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा.’ तो शिक्षित असल्याने बहुदा जास्त हुशार आहे. असे करून तो त्याच्या बुद्धिमत्तेचे प्रदर्शन घडवून देत आहे.
तितक्यात सिग्नल सुटला आणि दुचाकीवरील दोघांनीही त्या चारचाकीच्या पुढे जात त्यातील व्यक्तीकडे बघून जणू तो मूर्ख असल्याचा प्रत्यय आणून देण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा: प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली
तोपर्यत हे असेच सुरू राहणार
सातपूरच्या आयटीआयजवळच्या सिग्नलवर दुपारी दीडची वेळ होती. महात्मानगरहून येणारी वाहने सातपूरकडे जाण्यासाठी सिग्नलवर थांबलेली होती. तिकडे डावीकडील वाहनांना हिरवा कंदील असल्याने सुशील हॉस्पीटलकडून वाहने येत होती. मात्र कमी वाहने असल्याने ती भरकन निघून गेली अन सिग्नल टाईमनुसार सेट असल्याने तो सुरूच होता.
मात्र इकडील विशेतः रिक्षाचालकांना अजिबात धीर नसल्याने त्यांनी रिक्षा डाव्या बाजूने नेत सुशील हॉस्पीटलकडील रस्त्याच्या उजव्या बाजूने जात उभे राहिले आणि थेट घुसले, तेव्हा सुशील हॉस्पीटलकडून डाव्या बाजूने एक महिला सिग्नलची वेल असल्याने निघायला लागली, तेवढ्यात रिक्षावाले अगदी चुकीच्या पद्धतीने थेट घुसले अन सातपूरकडू निघून जाऊ लागले.
या साऱ्या प्रकाराने संबंधित महिला अतिशय संतापली. सिग्नलची वेळ असूनही तिला जाता आले नाही याचे दुःख आणि हा सारा प्रकार बिनदिक्कत घडत असतानाही कुणीही यावर लक्ष ठेवायला नाही याबाबत नाराजी व्यक्त करीत इथे वाहतूक पोलिस कुठे आहेत असा प्रश्न विचारून संताप करू लागली.
तेवढ्यात मागावून आलेल्या एकाने जाऊ द्या हो, नाशिकच्या लोकांना अजिबात वाहतूक सेन्स राहिलेला नाही अन थोडा वेळ थांबायलाही कुणाला वेळ नाही, हातपाय मोडतात तेव्हा त्यांना याचे महत्व कळेल, तोपर्यत हे असेच सुरू राहणार.