नारोशंकराची घंटा : मेरे पैर को ‘कल’ लगी है !

Divorce News
Divorce Newsesakal

लहान मुले ही देवाघरची फुले असतात. या निरागस मुलांकडून अलगदपणे कधी काय विनोद घडतो, हे त्यांच्याही लक्षात येत नाही. पाच वर्षांची अशीच एक निरागस मुलगी कोरोनानंतर प्रत्यक्ष शाळेत जायला लागते. घरी मनाप्रमाणे वागण्याची सवय अंगवळणी पडलेली असल्याने शाळेत सुरुवातीचे काही दिवस तिला बेशस्त वागण्याची जणू सवयच झाली होती.

या विद्यार्थ्यांना शाळेची शिस्त लागावी म्हणून शिक्षिकेने त्यांना मैदानावर खेळायला सोडले. एका पाठोपाठ दोन, तीन खेळ खेळल्यानंतर या विद्यार्थ्यांना मेडीटेशन करायला रांगेत बसवले. दोन मिनिटे शांत बसल्यानंतर विद्यार्थ्यांची चुळबुळ सुरु झाली. (Naro Shankarachi Ghanta politics comedy crime tragedy small children divorce nashik news)

Divorce News
Nashik News | सत्यजित तांबेंना भेटण्याचा निरोप आला, आम्ही भेटणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एक विद्यार्थिनी आपल्या जागेवरुन ताडकन उठली आणि थेट चालायला लागली. ही मुलगी कुठे चालली म्हणून तिच्या शिक्षिकेने विचारणा केली. तर मुलीने उत्तर दिले की, 'मेरे पैर को कल लगी है'. तिने दिलेल्या या उत्तरानंतर ही शिक्षिका विचारात पडली.

पुन्हा तिला विचारणा केली तर ती तेच म्हणाली. आता याचा अर्थ काय म्हणून या शिक्षिकेने दुसऱ्या शिक्षिकेला विचारले. तेव्हा त्यांना अर्थ कळला की, बराच वेळ एका जागेवर बसल्यामुळे तिच्या पायाला कळ लागली आहे. हिंदी अन इंग्रजी भाषा एकत्र झाल्याने हा गोंधळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी कपाळावर हात मारुन घेतला.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

Divorce News
Nashik News | सत्यजित तांबेंना भेटण्याचा निरोप आला, आम्ही भेटणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हल्ली लगेच घटस्फोट होतात ना!

लहान मुले कधी काय बोलतील आणि मोठ्यांची गोची करून ठेवतील याचा काही नेम नाही. पत्नी आजारी असल्याने तिला पाहण्यासाठी म्हणून नातेवाईकांचा राबता सुरू असतो. एके दिवशी पत्नीची दूरची बहिण तिच्या लग्न झालेल्या मुलासह बहिणीला पाहायला म्हणून येते. घरी आल्यानंतर गप्पा गोष्टी सुरू असतात.

आजारपणाचे कारण, काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी दोन्ही बहिणी बोलत होत्या. त्याचवेळी लहान मुलगा झोपेतून उठून खाली येतो. लागलीच मावशी त्याची विचारपूस करते.

कॉलेज कसे चालले आहे, अभ्यास परीक्षा याविषयी विचारते आणि आता पुढच्या महिन्यात लहान दादाच्या लग्नाला यायचं हवं, किती दिवस झाले तू आमच्याकडे आला नाही वगैरे सांगत त्याला आग्रह करते.

त्यावर मुलगा उत्तर देतो, तसे मला लग्नाला यायला आवडतही नाही आणि हल्ली लग्न झाल्याबरोबर लगेच घटस्फोट होतात ना... मुलाचे हे बोल ऐकून सारे वातावरण तंग बोते. तेवढ्यात मावशी असे ते सिरियलमध्ये असते, प्रत्यक्षात तसे होत नाही असे सांगत विषय संपविते. मुलाच्या आईला मात्र कारट्याविषयी प्रचंड संताप आलेला असतो...

Divorce News
Jalgaon News : यात्रेकरूंच्या बसला ओडीसा बॉर्डरजवळ अपघात; जिल्ह्यातील 31 यात्रेकरूंचा समावेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com