
नारोशंकराची घंटा : सामाजिक कार्यकर्त्याचे 'सिव्हिल'वर्क
सामाजिक कार्यकर्ते कधी कुठल्या कार्यात सहभाग घेतील हे काही सांगता येत नाही. त्यात महिलांच्या समस्या म्हटले की, यांच्या अंगात 'देवच' संचारतो. झाले असे की, सातपूर भागातील एका कार्यकर्त्याला शेजारील महिला आजारी पडल्याचे समजले. (naroshankarachi ghanta Civil Work of Social Activist sakal special nashik news)
ती महिला स्वत: दवाखान्यात जावू शकली असती किंवा रिक्षाने हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्याची तिची आर्थिक क्षमताही होती. पण सामाजिक कार्यकर्त्याच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी तत्काळ या महिलेला आपल्या गाडीवर बसवले. सिव्हिलमध्ये ॲडमिटही केले.
इथे त्यांच्या मित्राशी भेट झाली व त्याने या कार्यकर्त्याची धडपड बघून अलगदपणे फोटोही काढला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करताना वहिनींची काळजी घेताना सामाजिक कार्यकर्ते असा संदेशही दिला.
झाले...फेसबुकवर व्हायरल झालेला हा फोटो एक दिवस सामाजिक कार्यकर्त्याच्या पत्नीने बघितला. त्यानंतर या प्रकरणाची 'सीबीआय' चौकशी सुरु झाली. ही बाई कोण, तिच्याशी काय संबंध आणि बरेच काही. अखेर त्या कार्यकर्त्यांला सिव्हीलचे सामाजिक कार्य नाईलाजाने बंगद करावे लागले.