
नारोशंकराची घंटा : नाममहिमा मनात इतका फिट्ट की...
समाजातील सर्वात हुशार म्हणून शिक्षकांची ओळख आहे. अलिकडे तर राजकारण हे शिक्षकांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असे म्हटले जाते. अगदी शाळेतही राजकारणावर भरपूर चर्चा होते. त्यामुळे काही नावे मनात इतकी फिट्ट बसतात की त्याच्या साधर्मय् असेलली नावे आली तरी तेच नावे तोंडावर येते. मात्र त्यामुळे मोठा घोळ होऊन बसतो. त्याचे असे झाले... (naroshankarachi ghanta on ajit pawat nashik news)
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
एका महिला शिक्षिकेवर त्यांच्या मुख्याध्यापकांनी फार जोखमीची जबाबदारी सोपवली. वरिष्ठांनी आपल्यावर फार विश्वास टाकला म्हणून आपण दिलेलं काम वेळेत पूर्ण करू असा चंग या महिला शिक्षिकेने बांधला. झपाट्याने त्या कामाला लागल्या.
कामाचा भाग म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याकडून आधारकार्डही मागवले. त्यात एक आठवडा उलटला. आता अवघे दोन दिवस हातात असल्यामुळे कामाचा वेग प्रचंड वाढला. भराभर काम संपवण्याच्या नादात या मॅडमने विद्यार्थ्यांच्या नावातच 'राजकीय' घोळ घातला.
प्रथम अजित कासार ऐवजी त्यांनी थेट प्रथम अजित पवार आणि सुजय शरद सोनवणे ऐवजी सुजय शरद पवार अशी नावे लिहिली. दिलेली जबाबदारी आपण वेळेत पूर्ण झाली म्हणून त्यांची छाती ५६ इंच फुगली खरी, पण प्रत्यक्षात पाहिले तर विद्यार्थ्यांच्या नावाचेच 'राष्ट्रीयीकरण' झाले होते. ही बाब लक्षत येताच मुख्याध्यापकांनी या हुशार शिक्षिकेचे पक्षांतर करून टाकले.