नारोशंकराचा घंटा : नाट्यप्रेमींचा चळका...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Discussion

नारोशंकराचा घंटा : नाट्यप्रेमींचा चळका...!

स्थळ : शहरातील बहुपरिचीत नाट्यगृह... वेळ : नाटकाच्या प्रयोगाची...

सध्या नाशिककरांना अनेक नाटकांची मांदियाळी अनुभवण्यास मिळत आहे. राज्य बालनाट्य स्पर्धा, कामगार कल्याण नाट्यस्पर्धा सुरु आहेत. मात्र यासर्व नाटकांना नाटकातील संबंधित व्यक्ती अन् त्यांचे परिचित सोडून फारशी गर्दी दिसत नव्हती. (naroshankarachi ghanta on Choir of Theater Lovers nashik news)

हेही वाचा: नारोशंकराची घंटा : एका टीक-मार्कमुळे गमावली संधी!

यावर काही दर्दी मंडळी नाट्यगृहा बाहेर उभे राहून चर्चा करत होते. त्यांच्या चर्चेचा विषय असा होता की, प्रेक्षक या नाटकांकडे का पाठ फिरवत आहेत. नाट्यगृहातील खुर्च्या फारशा भरत का नाहीत... ही चर्चा सुरु असताना मात्र त्याच नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग सुरु होता...

त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना जाणीव करून दिली की ही चर्चा नाट्यप्रयोग सुरु असताना तुम्ही बाहेर उभं राहून करण्यापेक्षा नाटकाला बसा... म्हणजे किमान तुमची उपस्थिती तरी ग्राह्य धरली जाईल... त्या व्यक्तीचे बोल ऐकताच हे दर्दी नाट्यप्रेमी मात्र काही काळ अवघडले आणि न जाणे कुठे मार्गस्थ झाले...

हेही वाचा: नारोशंकराची घंटा : तुमच्‍या मित्रांना कॉल करून बोलवता का?

टॅग्स :NashikdramaDrama Theaters