नारोशंकराची घंटा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drinking

नारोशंकराची घंटा!

चल एक-एक घेऊया.....

पीने वालो को पीने का बहाना चाहिये, म्हणतात ना ते असे सकाळपासून वातावरणात गारवा आहे. त्यामुळे दिवसादेखील उबदार कपडे घालून दैनंदिन कामे करावी लागत आहे. थंडी जाणवत असल्याने त्याची तीव्रता कमी करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत होते. (naroshankarachi ghanta sakal special corner on drunkards office workers nashik news)

हेही वाचा: नारोशंकराची घंटा : रक्त म्हणजे पाणी वाटते का!

अशात दोन जण सायंकाळी ड्यूटीवरून सुटले. त्र्यंबकरोडवरून दोघेही एकत्र गप्पा मारत घरी जात होते. दरम्यान वाटेत त्यांना एक बिअर बार आढळून आला. ते बघताच एकाच्या तोंडातून पटकन चल एकेक घेऊया असे शब्द बाहेर पडले.

दुसऱ्याने नको चल जाऊ दे असे म्हटले. पहिल्याने पुन्हा त्यास सांगितले अरे थंडी वाजत आहे. थोडे गरम वाटेल. तर दुसऱ्याने अरे पण घरी बायको रागवेल, असे म्हटले. काही नाही रे काहीतरी कारण सांगू घरी असे म्हणत दोघांनीही शेवटी बारचा रस्ता धरला. अशा या दृश्यातून स्पष्ट झाले की, कारण काहीही असो पीने वालो को तो पीने का बहाना चाहिये.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: नारोशंकराची घंटा!

मी लई चलाख...

एका ऑफिसमध्ये वरीष्ठ सहकारी आपले ईप्सित साध्य करण्यासाठी कुरघोडी करण्यात शागिर्द... त्याला वाटते आपल्या शिवाय काहीच नाही... त्याच्या बरोबरच्या सहकार्यांना माहीत असते हा गाड्या खालचा...

तो बोलायला लागला की एकमेकास खुणा करीत त्याला प्रतिसाद देत आजचे मनोरंजन असे म्हणत वेळ काढतात. नेहमीप्रमाणे हा शागिर्द दुसऱ्याच्या कुरघोडी करायला लागला. ज्याची कुरघोडी करायला लागला त्याने त्याची कुंडली काढली होती.

त्या कुंडलीचे वाचन करीत ‘मी लई चलाख’ असल्याची प्रचिती दिली. शागिर्दचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता..

हेही वाचा: नारोशंकराची घंटा : तेल गेले अन तूपही गेले...