Nashik District Bank : जिल्हा बँकेच्या तोट्यातील 11 शाखांना लवकरच ‘कुलूप’

Nashik District Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तोट्यात असलेल्या शाखा बंद करून त्यांचा जवळच्या शाखेत विलीनीकरण करण्याचा निर्णय जिल्हा बँक प्रशासन घेण्याच्या तयारीत आहे.
Nashik District Bank
Nashik District Bank esakal

Nashik District Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तोट्यात असलेल्या शाखा बंद करून त्यांचा जवळच्या शाखेत विलीनीकरण करण्याचा निर्णय जिल्हा बँक प्रशासन घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे बँकेच्या ११ शाखा बंद होतील. ज्या शाखा बंद करण्यात येतील, त्या नजीकच्या शाखेशी जोडून सभासद खातेदारांना दिलासा देण्यात येणार आहे. ( 11 loss making branches of district bank to be blocked soon )

बँकेची ढासळणारी आर्थिक परिस्थिती व वाढत जाणारा प्रशासकीय खर्च पाहता प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. यापूर्वीही बॅंकेने ४३ शाखा बंद केलेल्या आहेत. नोटबंदीनंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकेची कर्जवसुली रखडल्याने दैनंदिन आर्थिक व्यवहारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती अडचणीत सापडली. मात्र, प्रशासनाकडून यावर पर्याय शोधून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

जिल्हा बँकेच्या प्रशासनाने गत काही वर्षांपासून बँकेच्या २१२ शाखांचे प्रत्यक्ष होणारे व्यवहार व त्यातून बँकेला मिळणारा लाभ, तसेच प्रशासकीय खर्च याचा ताळमेळ घेण्यास सुरवात केली होती. यातून पहिल्या टप्प्यात २३ शाखांमध्ये अल्प व्यवहार होत असल्याचे व उलट प्रशासकीय खर्च कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते कार्यालयीन खर्चाचे प्रमाण पाहता सदरच्या शाखा तोट्यात असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार प्रशासनाने संचालक मंडळाकडे सदरच्या बँक शाखा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. (latest marathi news)

Nashik District Bank
Nashik District Bank: जिल्हा सहकारी बँकेला सावरणार; कठोर पावले उचलण्याचे अजित पवार यांचे निर्देश

त्यानंतर कोरोना कालावधीदरम्यान पुन्हा २० शाखा बंद करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार ४३ शाखा बंद झालेल्या आहेत. बॅंकेची आर्थिक परिस्थिती अन बॅंकेचा परवाना धोक्यात सापडल्याने बॅंक प्रशासनाने पुन्हा ११ शाखा बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, ३१ मार्चची वसुली असल्याने हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला नव्हता.

आता ३१ मार्च होऊन गेला असल्याने बॅंक प्रशासन या शाखा बंद करण्याबाबत निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्याबाबत प्रशासक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊन या शाखा बंद करण्याचे आदेश निघतील, असा अंदाज आहे. शाखा बंद करण्याबाबत निर्णयास बॅंक प्रशासनाने दुजोरा दिलेला आहे.

बंद होणाऱ्या शाखा (कंसात त्याचे विलीनीकरण)

राजापूर, ता. येवला (नगरसूल), भारम, ता. येवला (सायगाव), सावरगाव, ता. येवला (येवला), नांदगाव शहर, ता. नांदगाव (नांदगाव मुख्य शाखा), भार्डी, ता. नांदगाव (मनमाड), कोठुरे, ता. निफाड (निफाड), गोंदे दुमाला, ता. इगतपुरी (वाडीवऱ्हे), दळवट, ता. कळवण (कनाशी), देवरगाव, ता. चांदवड (चांदवड), बहादुरी, ता. चांदवड (वडनेरभैरव), दिघवद, ता. चांदवड (काजीसांगवी).

Nashik District Bank
Nashik District Bank : बड्या थकबाकीदारांच्या सातबाऱ्यावर बोजा; थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बॅंक अॅक्शन मोडवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com