Nashik Missing Case : शहरातून 2 मुलीसह 4 विवाहिता बेपत्ता; एकूण 8 जण बेपत्ता झाल्‍याच्‍या पोलिस ठाण्यात नोंदी

Missing Case : शहर परिसरातून आठ जण बेपत्ता झाल्‍याच्‍या तक्रारी शुक्रवारी (ता.७) वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल झालेल्‍या आहेत.
Missing Case
Missing Caseesakal

Nashik Missing Case : शहर परिसरातून आठ जण बेपत्ता झाल्‍याच्‍या तक्रारी शुक्रवारी (ता.७) वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल झालेल्‍या आहेत. या बेपत्ता व्‍यक्‍तींपैकी दोन मुली, चार विवाहितांसह दोन पुरुषांचा समावेश आहे. सापडूनही शोध न लागल्‍याने कुटुंबीयांनी पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखली केली आहे. पहिल्‍या घटनेत वडाळा गावात वास्‍तव्‍यास असलेली १८ वर्षीय युवती ही गुरुवारी (ता.६) रात्री साडेनऊला घरी कुणालाही काहीही न सांगता निघून गेली. (4 married women including 2 girl are missing from city)

परिसरात तिचा शोध घेऊन न सापडल्‍याने वडिलांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुसऱ्या घटनेत कामटवाडा येथील कमलनगर येथील रहिवासी असलेली २४ वर्षीय तरुणी शुक्रवारी (ता. ७) सकाळी दहाला घरातून कुणाला काहीही न सांगता निघून गेली. तिचा शोध न लागल्‍याने त्यांच्या वडिलांनी अंबड पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्‍याची तक्रार नोंदविली. बेपत्ता झालेल्‍या चार महिलांमध्ये सातपुरच्‍या श्रमिकनगर येथील ३५ वर्षीय विवाहिता गुरुवारी (ता. ६) सकाळी आठला कार्बन नाका येथील कामाच्‍या ठिकाणी जाण्यासाठी घरातून निघाल्‍या.

परंतु कामाची वेळ संपूनही त्‍या घरी परतल्‍या नाही. यानंतर त्‍यांचा शोध घेता असता, ठोस माहिती मिळू शकली नाही. दुसऱ्या घटनेत सावरगाव (ता. पातुल, जि. अकोला) येथील व सध्या कॅनडा कॉर्नर येथे राहात असलेल्‍या ४३ वर्षीय विवाहिता महिला गुरुवारी (ता.६) सकाळी दहाला घरात कोणास काहीही न सांगता निघून गेल्‍या. याप्रकरणी महिलेचे पती यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिसऱ्या घटनेत जेलरोड येथील शिवराम नगर येथून शुक्रवारी (ता.७) सव्वा बाराला २४ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्‍या.

Missing Case
Missing Case : शहरातून सहा मुले, मुली बेपत्ता

घरात शोधूनही न सापडल्‍याने व फोनद्वारे संपर्क साधला असता, मोबाईल बंद आढळून आल्‍यानंतर कुटुंबीयांनी उपनगर पोलिस ठाण्यात धाव घेताना बेपत्ता झाल्‍याची तक्रार दाखल केली. चौथ्या घटनेत शुक्रवारी (ता.७) सकाळी सातला सुमारास नोकरीला जाण्यासाठी आम्रपाली झोपडपट्टी येथील घरातून बाहेर पडलेल्‍या २५ वर्षीय विवाहिता या घरी परतल्‍या नाही. त्यांचा फोनही बंद असल्‍याने त्‍यांच्या पतीने उपनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. चौथ्या घटनेत

बेपत्ता झालेल्‍या पुरुषांमध्ये नाशिकरोड येथील सहारा लॉन्‍सच्‍या मागील भागात राहणारा सलीम शब्‍बीर सय्यद (वय ३१) हा युवक गुरुवारी (ता.७) मध्यरात्री दोनला घराबाहेर पडला असता, पुन्‍हा परतला नाही. त्‍याला संपर्क होत नसल्‍याने नासिर सलीम सय्यद या युवकाने उपनगर पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. दुसऱ्या घटनेत ऑफिसला जातो असून सांगून घरातून शुक्रवारी (ता.७) सकाळी दहाला निघालेले राजू घोडेश्‍वर (वय ३५) हे पुन्‍हा घरी परतले नाही. त्‍यांचा शोध न लागल्‍याने त्‍यांच्‍या नातेवाईक यांनी अंबड पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

Missing Case
Nashik Missing Case: दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com