Nashik News : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांनी उचलला टोकाचा पाउल

Nashik : शहर परिसरामध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.
suicide
suicide esakal

नाशिक : शहर परिसरामध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. यात चौघांनी गळफास घेतला तर, विवाहितेने टॉयलेट क्लीनर प्राशन करीत आपले जीवन संपविले. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे. पूनम गणेश सोनवणे (२४, रा. अन्नपूर्णा रो हाऊस, कारगिल चौक, अंबड) असे मयत विवाहितेचे नाव आहे. पूनम हिने राहत्या घरी १७ मार्च रोजी टॉयलेट क्लिनर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सदरची घटना समजताच, तिला नातलगांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. (Nashik 5 people take extreme measures in different incidents in city )

यानंतर २१ मार्च रोजी तिला डिस्चार्ज देण्यात आले. मात्र, २६ एप्रिल रोजी तिला पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केले असता, मात्र, उपचार सुरु असताना रविवारी (ता.५) तिचा मृत्यू झाला. अंबड पोलीसांनी व्हिसेरा राखून ठेवला असून तो अहवाल आल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल. याप्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, हवालदार झोले तपास करीत आहेत.

रामनरेश बरविला भैसट (३१, रा. श्री गुरुजी हॉस्पिटलमागे, मूळ रा. बाखराबागनगर, उत्तरप्रदेश) या बांधकाम मजूराने बांधकाम साईटजवळील झाडास केबल वायर बांधून रविवारी (ता. ५) गळफास घेतला. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद केली असून हवालदार दिगंबर माेरे तपास करीत आहेत.

suicide
Nashik News : उन्हाच्या तडाख्यात कुरडई, पापड तयार करण्याचा धडाका

तसेच गीता विनायक कांबळे (७०, रा. ऑलिव्हिया, राॅयल काॅलनी, पखाल राेड) या वृद्धेने रविवारी (ता. ५) बेडरुममध्ये गळफास लावून घेतला. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, त्यांना मृत घाेषित करण्यात आले. मुंबई नाका पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद केली असून, सहायक उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत. अमित एकनाथ बाेरसे(२०, रा. सुमन अपार्टमेंट, चांगलचुंगल हॉटेलजवळ, पाथर्डी फाटा) याने रविवारी (ता. ५) दुपारी दीड वाजेपूर्वी घरातील हाॅलमध्ये गळफास घेतला.

त्याच्या आत्महत्येचे कारण कळले नसून इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर, सिद्धेश्वर देविदास चव्हाण (४३, रा. न्हावी गल्ली, काळाराम मंदिर पूर्व दरवाजा, पंचवटी) यांनी रविवारी (ता. ५) सकाळी घरातील हाॅलमध्ये गळफास घेत जीवन संपविले. पंचवटी पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद केली असून, हवालदार याेगेश वाडेकर तपास करीत आहेत.

suicide
Nashik News : जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेला 2 कोटींचा नफा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com