Nashik News : जिल्ह्यात 10 दिवसांत हटविले 61 हजार फलक

Nashik : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच दहा दिवसांत जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे ६१ हजारांवर भिंतीवरील चित्र, पोस्टर, फलक, झेंडे व अन्य साहित्य हटविले आहे.
hordings removing
hordings removingesakal

Nashik News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच दहा दिवसांत जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे ६१ हजारांवर भिंतीवरील चित्र, पोस्टर, फलक, झेंडे व अन्य साहित्य हटविले आहे. अजूनही ही कारवाई सुरूच असल्यामुळे आकडा वाढण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्चपासून लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक व खासगी ठिकाणावरील प्रचार साहित्य हटविण्यास प्रारंभ केला. (Nashik 61 thousand boards were removed marathi News)

महापालिका, नगरपंचायत, नगर परिषद व ग्रामपंचायत स्तरावरील विविध यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीत पोस्टर, बॅनर, ध्वज व भिंतींवरील राजकीय पक्षांनी रंगविलेल्या जाहिराती झाकण्याचे काम दहा दिवसांपासून सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर रंगविलेल्या विविध राजकीय पक्षांच्या तीन हजार ७५३ जाहिराती मिटविण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत दोन हजार २५३ पोस्टर, चार हजार ७४ बॅनर, १६ हजार इतर साहित्य काढण्यात आले आहे. यामध्ये खासगी मालमत्तांवरील सात हजार १३१ कारवायांचा समावेश आहे. अजूनही काही ठिकाणी मतदारांवर प्रभाव टाकेल, असे प्रचार साहित्य असून, ते हटविण्याचे काम यंत्रणांकडून सुरू आहे.

...तर गुन्हा दाखल होणार

नाशिक रोडला भिंतींवरील राजकीय जाहिराती व राजकीय घोषवाक्ये मिटविण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून करण्यात आले. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच ठिकाणी राजकीय मजकूर असलेल्या तशाच स्वरूपाच्या जाहिराती व घोषवाक्ये यंत्रणेला पाहायला मिळाली. त्यामुळे कुणीतरी खोडसाळपणा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढील काळात असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. (latest marathi news)

hordings removing
Nashik News : होळकर पुलाखालील मॅकेनिकल गेटला मुहूर्त! गांधी तलावातील प्रवाह राहणार बंद

बोलके आकडे

४७०२ : नाशिक लोकसभेतील कारवाई

१७०९४ : दिंडोरी लोकसभेतील कारवाई

३०१२३ : मालेगाव मध्य, बाह्य व बागलाण तालुक्यातील कारवाई

५१९१९ : जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणची एकूण कारवाई

७१२६ : जिल्ह्यातील खासगी ठिकाणची कारवाई

hordings removing
Nashik News : वणी आठवडे बाजारात ठेकेदाराची मनमानी; जादा करवसुलीने व्यापाऱ्यांसह शेतकरी त्रस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com