Nashik Accident News : दिंडीत दुचाकीस्वार घुसल्याने सावरगावचा तरुण ठार, 2 जखमी; पुणे- सोलापूर मार्गावर मोहोळजवळ अपघात

Nashik News : सावरगाव येथून अक्कलकोट येथे चाललेल्या पायी दिंडीवर काळाने घाला घातला असून, दिंडीतील एक तरुण जागीच ठार झाला
Sanket Nikam
Sanket Nikamesaka

येवला : तालुक्यातील सावरगाव येथून अक्कलकोट येथे चाललेल्या पायी दिंडीवर काळाने घाला घातला असून, दिंडीतील एक तरुण जागीच ठार झाला; तर दोन जण जखमी झाले आहेत. (Nashik Accident Sawargaon youth killed two injured news)

सावरगाव येथून अक्कलकोटला दरवर्षी पायी दिंडी जाते. या दिंडीत शेकडो भाविक सहभागी होतात. या वर्षीही सुमारे १०० च्या वर भाविकांसह दिंडी अक्कलकोटला रवाना झाली होती. या पायी दिंडीत पुणे-सोलापूर मार्गावर मोहोळजवळ एक मोटारसायकलस्वार दिंडीत घुसल्याने संकेत श्रावण निकम (वय २२) हा तरुण ठार, तर विष्णू काटे व गोरख काकड हे दोघे जखमी झाले.

सुमारे १२५ भाविक पायी दिंडीत जात असताना पुणे-सोलापूर मार्गावर मोहोळजवळ सकाळी सहादरम्यान एक तरुण मोटारसायकलवर मोबाईलने रील बनवत होता. त्या रीलच्या नादात तो वेगात दिंडीत घुसला अन त्याच्या जोरदार धडकेने संकेत रस्त्याने जाणाऱ्या टँकरखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. (latest marathi news)

Sanket Nikam
Nashik Accident News : नांदूर-शिंगोटे लोणी रस्त्यावर अपघातात 3 ठार; कंटेनर मोटरसायकल अपघात

विष्णू काटे व गोरख काकड हे दोघे जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच येथील शिवसेनेचे माजी सभापती संभाजीराजे पवार, खरेदी-विक्री संघाचे संचालक मनोज रंधे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. संकेतचा मृतदेह सावरगाव येथे आणण्यात आला असून, रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

Sanket Nikam
Nashik Fire Accident : आगीने 15 घरांची राखरांगोळी; भारतनगर येथील घटना; पाच जण जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com