Nashik Fire Accident : आगीने 15 घरांची राखरांगोळी; भारतनगर येथील घटना; पाच जण जखमी

Fire Accident : भारतनगर येथे आग लागून १५ घरे जळून राख झाली. संसारोपयोगी साहित्यासह लाखोंची रोख रक्कम जळून मोठे नुकसान झाले
A house fire. In the second photo, burnt houses.
A house fire. In the second photo, burnt houses.esakal

Nashik Fire Accident : भारतनगर येथे आग लागून १५ घरे जळून राख झाली. संसारोपयोगी साहित्यासह लाखोंची रोख रक्कम जळून मोठे नुकसान झाले. घटनेत पाच जण जखमी झाले असून, यामध्ये एका वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. पती-पत्नीच्या वादात पतीने पत्नीसह घरास जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात लागलेल्या आगीत शॉर्टसर्किट होऊन तसेच सिलिंडरचा स्फोट होऊन अन्य घरांनाही आग लागण्याची घटना शनिवार (ता. २०) दुपारी तीनच्या सुमारास घडली. (Nashik Fire Accident 15 houses burnt to ashes incident at Bharat Nagar)

जळालेले पैसे
जळालेले पैसे esakal

एकमेकास लागून असलेल्या पत्रा, लाकडाच्या घरांनी काही वेळेतच रौद्ररूप धारण केले. त्यात १५ घरे जळून राख झाली, अशी माहिती नागरिकांकडून देण्यात आली. सर्व घरातील संसारोपयोगी साहित्यासह नवीन कपडे, रोख रक्कम जळून लाखांचे नुकसान झाले.

अग्निशामक विभागास माहिती मिळताच लिडींग फायरमन किशोर पाटील यांच्यासह चार अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी परिसरातील नागरिकांनी घरांना लागून असलेल्या मोकळ्या मैदानातून आगीवर पाण्याचा मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न केला.

आगीचे प्रमाण अधिक असल्याने अग्निशामक विभागास माहिती देण्यात आली. चार बंबांच्या साह्याने दोन तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशामक विभागास यश आले. आगीत जैनब शहा (एक वर्ष), मुस्कान हसन शहा (२२), जहेद शहा, सदाफ शहा, खुशबू शहा असे पाच जण जखमी झाले आहे.

दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशामक बंब आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने वेळेत आगीवर नियंत्रण मिळाल्याने मोठी दुर्घटना टाळली. बिर्या नामक व्यक्ती आणि त्याच्या पत्नीत वाद झाला.

त्याने पत्नी आणि घरास चालण्याचा प्रयत्न केला. त्या आगीच्या कचाट्यात अन्य घरे जळून नुकसान झाले, अशी माहिती पीडितांकडून देण्यात आली. त्यात सोन्याच्या वस्तू तर काहींची रोख रक्कमही जळून नुकसान झाल्याने सर्वजण उघड्यावर पडल्याने त्यांनी एकूणच ठाहो फोडला. मुंबई नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (latest marathi news)

A house fire. In the second photo, burnt houses.
Jalgaon Fire Accident : कंपनी व्यवस्थापकासह मालकाला अटक! केमिकल कंपनी स्फोटातील जखमी 2 कामगारांचा मृत्यू

अग्निशामक विभागाचा १४ ते २० सेवा सप्ताह सुरू होता. यानिमित्ताने मुख्यालयात कार्यक्रम सुरू होता. अशातच भारतनगर येथे आग लागण्याची घटना घडली. तत्काळ चार बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले. मोठी आग विझविण्यात अग्निशामक विभागास यश तर आलेच शिवाय या आगीच्या दुर्घटनेने त्यांच्या सेवा सप्ताहाचा समारोप झाला, अशी चर्चा परिसरात रंगली होती.

आश्‍चर्याचा धक्का

आगीत जळून राख झालेल्या घरांपैकी एका घरात पत्र्याच्या कोठी भरून पैसे तसेच स्टीलचे पातेले आणि छोट्या पत्र्याच्या डब्यात ठेवलेले नोटांचे बंडल अशी लाखांची रक्कम अर्धवट जळालेल्या स्वरूपात नागरिकांना आढळून आली. इतक्या मोठ्या स्वरूपात तेही एका झोपडीत रक्कम असून ती रक्कम आगीत जळून नुकसान झाल्याचे बघताच नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

यांची जळाली घरे

दिलीप सकट, हसन शहा, अनिता राजवाटवणे, विमल घुगे, वीरेंद्र शर्मा, शाहरुख शहा, मुस्कान शहा, भारती गोसावी, मिसबाह शेख, दीपक उगले, रमेश पाटोळे, तौसीफ शहा, बिस्मिल्ला शेख, चंद्रकांत हिरे.

A house fire. In the second photo, burnt houses.
Ulhasnagar Fire Accident : उल्हासननगरात आयसीआयसीआय बँकेच ATM आगडोंबित जळून खाक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com