Nashik News : विनयभंगप्रकरणी आरोपीला 3 वर्षांची शिक्षा

Nashik : पीडित महिलेच्या घरासमोर येऊन अश्लिल इशारे केल्यानंतर, मारून टाकण्याची धमकी देणार्या आरोपीला नाशिक न्यायालयाने ३ वर्षे साधा कारावास व १० हजार ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
crime
crimeesakal

नाशिक : पीडित महिलेच्या घरासमोर येऊन अश्लिल इशारे केल्यानंतर, मारून टाकण्याची धमकी देणार्या आरोपीला नाशिक न्यायालयाने ३ वर्षे साधा कारावास व १० हजार ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. योगेंद्र नामदेव बेंडकुळे (३०, रा. शिवशक्ती अपार्टमेंट, लामखेडे मळा, पंचवटी) असे आरोपीचे नाव असून तो सरकारी नोकरदार आहे. (Nashik Accused sentenced to 3 years in molestation case marathi News )

पीडितेच्या फिर्यादीनुसार, ४ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी पाच वाजता आरोपी बेंडकुळे याने पीडितेच्या घराच्या दारासमोर येऊन अश्लिल इशारे करीत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच त्यानंतर शिवीगाळ करीत येथून निघून जा, अन्यथा एकेकाला कुर्हाडीने मारून टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणी पंचवटी पोलीसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालिन महिला उपनिरीक्षक एच.एन. देवरे यांनी तपास करीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.

crime
Nashik News : शहरातील 650 रुग्णालये रडारवर; सनद न लावणाऱ्या रुग्णालयांचा परवाना होणार रद्द

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्यासमोर खटला चालला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता श्रीमती सुनिता चिताळकर यांनी कामकाज पाहिले. आरोपीविरोधात दोषारोप सिद्ध झाल्याने न्या. प्रतिभा पाटील यांनी आरोपी बेंडकुळे यास ३ वर्षांचा साधा कारावास व १० हजार ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एम.ए. खंबाईत, महिला अंमलदार पी.पी. गोसावी यांनी पाठपुरावा केला.

crime
Nashik News : चोरट्यांना जेरबंद करणाऱ्या पोलिसांवर कौतुकाची थाप! येवला शहर पोलिसांचा सत्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com