Aditya Thackeray : दत्तक पिता, ब्लू प्रिंटवाल्यांनी नाशिककरांना फसवले! आदित्य ठाकरे यांचा भाजप, मनसेवर घणाघात

Nashik News : लोक ब्लू प्रिंट घेऊन येणार होते त्यांनी काय दिले, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि मनसेवर निशाणा साधला.
Shiv Sena Youth Sena Chief Aditya Thackeray speaking at a rally on Friday to campaign for Nashik Lok Sabha Constituency candidate Rajabhau Waje of Maha Vikas Aghadi.
Shiv Sena Youth Sena Chief Aditya Thackeray speaking at a rally on Friday to campaign for Nashik Lok Sabha Constituency candidate Rajabhau Waje of Maha Vikas Aghadi.esakal

Nashik News : गेल्या दहा वर्षांत भाजपने पदोपदी जनतेची फसवणूक केली आहे. नाशिकला दत्तक घेणाऱ्या पित्याने नाशिककरांना काय दिले. तर काही लोक ब्लू प्रिंट घेऊन येणार होते त्यांनी काय दिले, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि मनसेवर निशाणा साधला. (Nashik Aditya Thackeray)

राजाभाऊ वाजे यांच्यासारखा निष्ठावान विरुद्ध गद्दारची ही लढाई असल्याचा घणाघात त्यांनी केला. पवननगर मैदानावर शुक्रवारी (ता. १७) महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली. त्या वेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, ॲड. यतीन वाघ, आमदार नरेंद्र दराडे, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, नीलेश कराळे.

डी. एल. कराड, संजय चव्हाण, लक्ष्मण जायभावे, नीलेश साळुंखे, भारत कोकाटे, भास्कर गावित, राजू देसले, डी. जी. सूर्यवंशी, हर्षदा बडगुजर, किरण गामणे, शीतल भामरे उपस्थित होते. या वेळी आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेवर चौफेर फटकेबाजी केली. ते म्हणाले, पाच टप्प्यांत महाविकास आघाडीचे जास्त उमेदवार निवडून येतील. इंडिया आघाडीचे सरकार येईल, हे लिहून देतो.

भविष्य वर्तविण्यासाठी मी काही ज्योतिषी नाही, पण तुम्ही दोनशे पार होणार नाही, याची खात्री देतो, असे ते म्हणाले. भाजपला हुकूमशाही राज्य आणायचे आहे आणि संविधान बदलण्याचा त्यांचा अजेंडा आहे. भाजपला संविधान बदलायचे आहे, असे पंकजा मुंडे बोलल्या आहेत. त्यासाठी त्यांना चारशेपार खासदार हवे आहेत. ‘एकही भूल कमळ का फूल’ असे दक्षिणेकडील राज्य म्हणत आहेत.

दिल्लीत आपला सातही जागा मिळतील. जम्मू- काश्मीरमधील ३७० कलम हटविल्याचा आनंद. पण भाजप दोन जागा इथे लढवत नाहीये. एवढे काम केले तर मग उमेदवार का मिळत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दहा वर्षांत आपल्याला काय मिळाले? नाशिकला दत्तक घेऊ म्हणणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवढे मोठे झाला कधी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (latest marathi news)

Shiv Sena Youth Sena Chief Aditya Thackeray speaking at a rally on Friday to campaign for Nashik Lok Sabha Constituency candidate Rajabhau Waje of Maha Vikas Aghadi.
Nashik Sharad Pawar : भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार यांची शेतीमालासह कांदाप्रश्नी टीका

कुणी म्हणत होते ब्लू प्रिंट काढू, पण त्यांनी आपल्याला काय दिले, असा टोला त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. आम्ही म्हणतो आम्हाला सेवा करण्याची संधी द्या. दहा वर्षांत खासदार गोडसे यांनी खोटारडेपणा केला. दोनदा खासदार केले; पण याची जाणीव ठेवायला हवी होती. त्यामुळे आजची लढाई ‘निष्ठावंत विरुद्ध गद्दार’, अशी असल्याचे त्यांनी म्हटले.

प्रजवल रेवनाला पळून जाण्यास मदत केली. दक्षिण मुंबईत भाजपने एका रेवन्नाला उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे उद्योग गुजरातला पाठवले. साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आणली. महायुती सरकारने वेदांता पावणेदोन लाख कोटी गुंतवणूक करणार होते. टाटा एकर बस, महानंद गुजरातला दिले. वर्ल्डकप फायनल गुजरातला नेली. त्यामुळे महाराष्ट्र द्वेषी सरकारला धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी म्हटले.

नीलेश कराळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजकांचे १४ लाख कोटींचे कर्ज माफ केले; परंतु शेतकऱ्यांचे दीड लाख कोटी कर्ज माफ करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. देशाची लूट भाजप सरकारने केली. मोदी स्वतःला गरीब म्हणतात; पण त्यांच्याकडे तीन कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिकमध्ये एकही मोठा उद्योग आलेला नाही. दहा वर्षांत उद्योग न आल्यामुळे बेरोजगारी वाढली. राजाभाऊ तुम्ही मोठा शासकीय उद्योग नाशिकमध्ये आणण्याचे आवाहन डी. एल. कराड यांनी केले.

Shiv Sena Youth Sena Chief Aditya Thackeray speaking at a rally on Friday to campaign for Nashik Lok Sabha Constituency candidate Rajabhau Waje of Maha Vikas Aghadi.
Nashik Lok Sabha Election : 107 वृद्ध, 10 दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

संविधान रक्षणाची ही लढाई

संविधानाच्या रक्षणासाठी ही निवडणूक आहे. भाजपला स्वतःचे संविधान बनवायचे आहे. देशातील सर्वांत मोठे धर्मग्रंथ संविधान आहे. ते टिकविण्यासाठी आपण राजाभाऊ वाजे यांना निवडून देण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.

गोडसेंनी कुटुंबाशी गद्दारी केली ः बडगुजर

उमेदवारी जाहीर होताच सिन्नरसह शहरात जल्लोष झाला. राजाभाऊ अंत्यविधीला गेले तर तिरडी बांधतात; पण राजाभाऊ आता तुम्हाला सरकारची तिरडी बांधायची आहे. खासदार गोडसेंनी कुटुंबाशी गद्दारी केली. अशा गद्दारांना गाडण्यासाठी जनता सज्ज झाली आहे. अनेक उद्योग बंद आहेत. आयटी पार्क लॉजिस्टिक पार्क होणार म्हणून सांगितले; परंतु काहीच सुरू झाले नाही. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. आपण हे उद्योग सुरू करावे, तसेच नवीन उद्योग आणून येथील युवकांना रोजगार द्यावा, असे आवाहन सुधाकर बडगुजर यांनी केले.

बदल घडविण्याचा जनतेचा निर्धार ः वाजे

बदल घडविण्याचा जनतेने विचार केला आहे. आयटी पार्कचे दोन वेळा उद्घाटन झाले; पण सुरू झाले नाही. संदर्भ सेवा रुग्णालय फक्त खोकल्याचे औषध देण्यासाठीच उरले आहे. सर्वसामान्य लोकांसाठी बदल घडवणे महत्त्वाचे आहे. फुटलेल्या पक्षांना यांनी चिन्हे बहाल केले. येत्या सोमवारी मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा, असे आवाहन वाजे यांनी केले.

Shiv Sena Youth Sena Chief Aditya Thackeray speaking at a rally on Friday to campaign for Nashik Lok Sabha Constituency candidate Rajabhau Waje of Maha Vikas Aghadi.
Nashik City Transport : गायकवाड सभागृह परिसरात वाहतूक बंदी! उद्यापासून अंमलबजावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com