Nashik Agriculture News : शेणीतला मक्याच्या शेतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग!

Nashik News : शेनित (ता. इगतपुरी) गावच्या पदवीधर तरुण शेतकऱ्याने १५ एकरावर स्वीट कॉर्न (गोड मका) लागवडीच्या अभिनव प्रयोगाने लेकराबाळांसहित सर्वांचे तोंड गोड केले आहे.
Young Gokul Jadhav, a graduate, has successfully cultivated sweet corn in 15 acres by experimenting with maize farming.
Young Gokul Jadhav, a graduate, has successfully cultivated sweet corn in 15 acres by experimenting with maize farming.esakal

इगतपुरी : शेती आणि शेतकरी यांचे गणित कोलमडल्याची सर्वत्र चर्चा होत असतांना शेनित (ता. इगतपुरी) गावच्या पदवीधर तरुण शेतकऱ्याने १५ एकरावर स्वीट कॉर्न (गोड मका) लागवडीच्या अभिनव प्रयोगाने लेकराबाळांसहित सर्वांचे तोंड गोड केले आहे. कृषी पदवीधर असलेले गोकुळ जाधव यांच्या सूक्ष्म नियोजनाने त्यांचा प्रयोग पंचक्रोशीत चर्चेचा विषय आहे. (innovative experiment in cultivation of maize in sheni)

उच्च शिक्षित असूनही नोकरीवर अवलंबून न राहता शेतात अनेक नवनवीन उपक्रम राबवितांना मागील वर्षी दहा एकरात टोकन पद्धतीने सोयाबीन पिकाची यशस्वी लागवड केली. गोकुळ जाधव यांना फेब्रुवारी महिन्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचा आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त झाला. आई वडील,त्यांचे मोठे भाऊ प्रवीण जाधव,गोकुळ जाधव यांची पत्नी अर्चना जाधव हेही मेहनत घेतात.

मका खाण्यास गोड असून पावसाळ्यात त्याला प्रचंड मागणी असते. येत्या आठवडाभरात त्यांचे दाणेदार कणीस निघणार आहे.या स्वीट कॉर्न पासून ग्लुकोज पावडर बनवता येते. स्वीटकाँर्नची झाडे सात फूट एवढी वाढली आहेत.लागवडीचे अंतर दोन बाय एक आहे.या शेतीसाठी एकरी बियाणे दोन किलो लागले आहे. उरलेला पाला पाचोळा जनावरांचा चारा म्हणून उपयोग होतो. स्वीट कॉर्न बाजारात १ हजार ५०० रुपये टन भावाने विकला जातो.

यातून जनावरे दूधही चांगले देतात. स्वीट कॉर्नला १८ ते १९ रुपये किलो भाव मिळतो. गेल्यावर्षी दहा टन उत्पन्न मिळाले. यावर्षीही चांगले उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापारी हे स्वीट कॉर्न जागेवर घ्यायला येत असल्याने वाहतूक खर्चही लागत नाही. (latest marathi news)

Young Gokul Jadhav, a graduate, has successfully cultivated sweet corn in 15 acres by experimenting with maize farming.
Nashik News : विभागीय स्तरावर वसतिगृहांसाठी 45 कोटी; मंत्री अतुल सावे यांची माहिती

दाणेदार कणीस आले असून आठवड्यात काढणीला येणार आहे. या कणीसला युरोप देशामध्ये मागणी असल्याने तात्काळ विक्री होते. लागवड केल्यानंतर ३ महिन्यानंतर काढणीला येतात. गोकुळ जाधव यांनी चौकटी बाहेरील विचार, शेतीतील प्रयोग तालुक्यातील इतर शेतकऱ्यांसाठी सकारात्मक आशेचा किरण ठरत आहे.

"चारा पिकात मक्याला मोठे महत्व आहे.मागील वर्षांपासून सदर पिकाची लागवड केली झाडांची उंची, दाणे, कणसाचा आकार लागवडीपूर्वी सर्व क्षेत्राची नांगरण, कुळवन करून चांगली मशागत केली. शेती व्यवसायामुळे कुटुंबाला समृद्धता मिळत आहे." - गोकुळ जाधव,शेतकरी,शेनीत

Young Gokul Jadhav, a graduate, has successfully cultivated sweet corn in 15 acres by experimenting with maize farming.
Nashik Assembly Constituency : उत्तर महाराष्ट्रातील निवडणूक निकालाबाबत उत्कंठा शिगेला; कोण जिंकणार, कोण हरणार याविषयी पैजा लागल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com