Nashik Water Shortage : निफाडला पाणी, चाराटंचाई शेतकऱ्यांच्या मुळावर; पाणवेलींमुळे पाणी दूषित

Water Shortage : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून नावलौकिक असलेल्या तालुक्याची होरपळ वाढली असून गेल्या काही वर्षांपासून अवकाळी, गारपीट, नैसर्गिक आपत्ती, यामुळे बळिराजा पुरता मेटाकुटीला आला आहे.
Water Shortage
Water Shortageesakal

Nashik Water Shortage : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून नावलौकिक असलेल्या तालुक्याची होरपळ वाढली असून गेल्या काही वर्षांपासून अवकाळी, गारपीट, नैसर्गिक आपत्ती, यामुळे बळिराजा पुरता मेटाकुटीला आला आहे. आधीच अत्यल्प झालेला पाऊस आणि त्यामुळे तयार झालेली दुष्काळाची परिस्थिती, आग ओकणारा सूर्य आणि डोळ्यादेखत करपणारी पिके, यामुळे दुष्काळाची भयानक दाहकता तालुक्यात जाणवू लागली आहे. ()

त्यातच पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्यामुळे शेतीव्यवसाय आता संकटात सापडला आहे. यावर्षी एप्रिलमध्येच पाणीटंचाईने उग्र रूप धारण केल्याने पाण्यावाचून पिके जगविण्याचा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. तालुक्याच्या दक्षिण भागातून गोदावरी, दारणा नद्या वाहतात. मात्र, नदीपात्रात असणाऱ्या पाणवेलींमुळे नदीपात्रातील पाणी दूषित बनल्याने हे पाणी जनावरे देखील पीत नाहीत. त्यातच या पाणवेलींची दुर्गंधी परिसरातील गावात पसरून नागरिकांना साथीच्या आजाराचा सामना तालुक्यातील लोकांना करावा लागत आहे.

हंडाभर पाण्यासाठी भटकंती

पालखेड कालव्याचे पाणी गोई नदीपात्रात टाकून मरळगोई, पाचोर, ब्राह्मणगाव, गोरेगाव, भरवस, बाहेगाव, मानोरी, आंबेगाव, निमगाव वाकडा या गावांची तहान भागवली जात होती. मात्र, आता गोई नदी कोरडी पडल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे.

पालखेड कालव्यावरच उगाव, वनसगाव, शिवडी, खेडे, सारोळे खुर्द या गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. कारण पालखेड कालव्याचे पाणी विनिता नदीपात्रात टाकून त्याद्वारे या गावांची तहान भागवली जाते. उत्तरेकडील सावरगाव, रेडगाव, नांदूर खुर्द, खडकमाळेगाव, खानगाव नजीक, टाकळी विंचूर ही गावे कायम दुष्काळी छायेत आहेत. (latest marathi news)

Water Shortage
Nashik Water Shortage: नाशिक जिल्ह्यात उरला 44 टक्के जलसाठा! 31 जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान

तालुक्याच्या दक्षिणेकडील सरहदीवर असणारी तळवाडे, पिंपळगाव निपाणी, भेडाळी औरंगपूर, महाकरपुर, बापतवाडी, रामनगर ही गावे अनेक वर्षांपासून दुष्काळ झेलत आहे उन्हाळा सुरू होताच या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. नांदूरमध्यमेश्वरलाही उन्हाळ्यात दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जातोय.

''सोनेवाडी येथील पाझर तलाव कोरडाठाक पडला आहे. तो केवळ पावसाचे पाण्यानेच भरतो. इतर वेळी पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनातून भरणे शक्य असते. परंतु शासकीय स्तरावरील परवानगी अन पाणीटंचाई अहवाल यावरच पाणी साठवण तलावात पाणी येण्याचे नियोजन होत असते. त्यामुळे कोरडा तलाव अन पाणीटंचाईने शेतकरी हवालदिल आहेत.''- बाबूराव सानप, अध्यक्ष शिवडी सोसायटी

''निफाड तालुक्यातील उत्तर भागात शेतीपाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. खरड छाटणी केलेल्या द्राक्षबागांना पाणीटंचाईचा फटका बसत आहे. त्यामुळे मल्चिंग द्राक्षवेलीचे बुडावर टाकून ओलावा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न द्राक्ष उत्पादक करत आहे.''- ॲड. रामनाथ शिंदे संचालक, द्राक्ष बागायतदार संघ

Water Shortage
Nashik Water Shortage : पिंपळगाव (वा) ला 29 वर्षानंतर टॅंकर; 5 दिवसाआड पाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com