esakal | नाशिकच्या बाजार समित्यांच्या निवडणुका जानेवारीत होणार
sakal

बोलून बातमी शोधा

nashik market committee

नाशिकच्या बाजार समित्यांच्या निवडणुका जानेवारीत होणार

sakal_logo
By
संतोष विंचू,येवला

येवला : आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मुदतवाढीला ब्रेक लावत निवडणुकीचा मुहूर्त निश्‍चित केला आहे. त्यानुसार उद्यापासून मतदार याद्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यातील १० हून अधिक बाजार समित्यांच्या मुदत संपली. त्यामुळे त्यांच्या निवडणुकीचा फड आता रंगताना दिसेल.

हेही वाचा: Lakhimpur: देशव्यापी आंदोलनाची सुरूवात महाराष्ट्रातून - संजय राऊत

मागील वर्षी ऑगस्टमध्येच जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. यातील घोटी व येवला बाजार समितीवर प्रशासक मंडळ नेमलेले आहे. कृषिमंत्र्यांच्या मालेगाव बाजार समितीची मुदत या वर्षी मार्चमध्ये संपली. तर आशिया खंडातील प्रसिद्ध लासलगाव बाजार समितीची मुदत मेमध्ये संपली. येथेही निवडणुकीचा फड रंगताना दिसेल.

ज्या बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत २३ ऑक्टोबर रोजी अथवा त्यापूर्वी संपुष्टात आली आहे. बाजार समित्यांवर या तारखेपूर्वी प्रशासक नियुक्ती झाली आहे, अशा समित्यांच्या निवडणूका जाहीर कार्यक्रमाप्रमाणे होतील. या बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रारूप व अंतिम मतदार याद्या दिनांक ३० सप्टेंबरपर्यंत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संचालक मंडळाची मुदत दिनांक २३ ऑक्टोबरनंतर संपुष्टात येणार आहे, अशा समित्यांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र आदेश निघतील.

हेही वाचा: Drug case: NCB कडून शाहरुख खानच्या ड्रायव्हरची चौकशी

प्राधिकरणाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.यासंदर्भात लवकरच सूचना मिळतील. पालकमंत्री भुजबळ यांनी मार्चमध्ये प्रशासकीय मंडळाच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली. या काळात आम्ही बाजार समिती व शेतकरी हित जोपासत कामकाज केले.

- वसंतराव पवार, मुख्य प्रशासक, बाजार समिती, येवला

असा आहे कार्यक्रम

  • पारूप मतदार यादी प्रसिद्ध : १० नोव्हेंबर

  • अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : ६ डिसेंबर

  • उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती : १६ ते २२ डिसेंबर

  • अर्ज छाननी : २३ डिसेंबर

  • माघार : २४ डिसेंबर ते ७ जानेवारी

  • मतदान : १७ जानेवारी

  • मतमोजणी : १८ जानेवारी

loading image
go to top